कोल्हापूर- कोरोनाची परिस्थिती हाताळायला हे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत आज (शुक्रवार) भाजपच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. 'मेरा आंगण मेरा रणांगण' हे घोषवाक्य घेऊन भाजपचे कार्यकर्त्यांनी तोंडाला काळे मास्क, काळ्या फिती लावून ठाकरे सरकारचा निषेध नोंदवला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा कोल्हापुरातील संभाजीनगर येथे आपल्या घरासमोर अंगणात हे आंदोलन केले.
'मेरा आंगण मेरा रणांगण' आंदोलनाच्या माध्यमातून चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर तोफ, म्हणाले... - भाजप आंदोलन न्यूज
भाजपच्या वतीने आज राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. कोरोनाची स्थिती हाताळायला हे सरकार कमी पडत असल्याचा आरोप भाजपने केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा कोल्हापुरातील संभाजीनगर येथे आपल्या घरासमोर अंगणात हे आंदोलन केले.

चंद्रकांत पाटलांची उद्धव ठाकरेंवर तोफ
चंद्रकांत पाटलांची उद्धव ठाकरेंवर तोफ
चंद्रकांत पाटील यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीसुद्धा उपस्थित होत्या. प्रत्येकाच्या हातामध्ये फलक देण्यात आले होते. या फलकाद्वारे भाजपने आपल्या मागण्या सरकारकडे मांडल्या आहेत. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खरपूस समाचार घेतला. एवढेच नव्हे तर राज्य सरकारने पन्नास हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्याची मागणीसुद्धा पाटील यांनी केली. यासंदर्भातच चंद्रकांत पाटील यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...
Last Updated : May 22, 2020, 4:47 PM IST