कोल्हापूर - ज्यांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता आहे, तेच रात्री-अपरात्री भाजपमध्ये येण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. भाजपमध्ये यावे म्हणून मी कोणाच्याही दारात जात नसल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
हसन मुश्रीफ भाजपमध्ये आले तर चांगलीच गोष्ट
प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांचे कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. मुश्रीफ हे सहृदयी माणूस असून ते अनुभवी आहेत. त्यांच्यासारखे लोक भाजपमध्ये आले तर चांगलीच गोष्ट असल्याचे पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जे १०-१२ आमदार भाजपमध्ये येणार आहेत. त्यात कोल्हापूरच्या कोणाचाही समावेश नसल्याचा खुलासाही पाटील यांनी यावेळी केला.
ज्यांना राजकीय भवितव्याची चिंता तेच रात्री-अपरात्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला - चंद्रकांत पाटील मी टोपी फेकलेली आहे. ती कुणालाही बसेल त्यातूनच आमदार विश्वजीत कदम यांनी मी भाजपात जाणार नसल्याचे वक्तव्य केल्याचे पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांचे शहरातील दसरा चौकात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी 'महाराष्ट्र का नेता कैसा हो चंद्रकांतदादा जैसा हो' अशा जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.