कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या भाषेत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली होती. या टीकेनंतर संपूर्ण राज्यात या घटनेचा निषेध व्यक्त होत आहे. याबाबत भाजपने माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. वादग्रस्त वक्तव्य करणारे पडळकर यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शब्द जपून वापरण्याची समज दिली असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. दरम्यान, गोपीचंद चुकला पण इतरांनी बोललेले चालते का? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल (बुधुवार) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेनंतर राष्ट्रवादीने राज्यभर आंदोलने पुकारली. यावेळी गेल्या 24 तासात भाजपकडून अधिकृत कोणतीच प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया दिली. आमदार गोपीचंद पडळकर हा समजूतदार कार्यकर्ता आहे. शरद पवार यांच्याबद्दल त्यांच्या मनात आदर आहे. शरद पवार यांनी छोट्या जातीला महत्त्व दिले नाही हा पडळकर यांचा अनुभव असेल. मात्र, त्यांचा अनादर व्यक्त करण्याचा पडळकर यांचा हेतू नव्हता, अस म्हणत पडळकर यांची बाजूसुद्धा चंद्रकांत पाटील यांनी घेतली.
गोपीचंद चुकला पण इतरांनी बोललेले चालते का? चंद्रकांत पाटलांचा सवाल - कोल्हापूर भाजप न्यूज
वादग्रस्त वक्तव्य करणारे पडळकर यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शब्द जपून वापरण्याची समज दिली असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. दरम्यान, गोपीचंद चुकला पण इतरांनी बोललेले चालते का? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
गोपीचंद चुकला पण इतरांनी बोललेले चालते का? चंद्रकांत पाटलांचा सवाल
राजकारणात शब्द जपून वापरावे लागतात, कारण त्याची जखम खूप दिवस असते. आमदार गोपीचंद पडळकर शब्द चुकला पण इतरांनी काहीही बोललेले चालते का? असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी केला. त्यामुळे सगळ्यांनीच राजकीय संस्कृती जपायला हवी असेही पाटील यांनी सांगितले.
Last Updated : Jun 25, 2020, 6:24 PM IST