महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेने राम मंदिरासाठी काहीही न करता केवळ पोकळ दावे केले; चंद्रकांत पाटलांची टीका..

देशातील तमाम हिंदू भक्तांचा एक रोमांचकारी प्रसंग असताना, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ३०० नावे रामजन्मभूमीच्या भूमीपूजनाच्या सोहळ्याला आमंत्रित करण्यात आली आहेत. त्यामुळे यात विरोध करण्याचे कारण नाही. उलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीच मोठी अडचण निर्माण झाली आहे. कारण सत्तेत असणाऱ्या सहयोगी पक्षाचे काय मत आहे, हे जाणून घेणे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. त्यांना जायचे का नाही, हे त्यांनी ठरवावे. हिंदुत्वापेक्षा ठाकरेंना खुर्ची महत्वाची आहे, असे पाटील म्हणाले.

Chandrakant Patil attacks on Thackeray
ठाकरेंना हिंदुत्वापेक्षा खुर्ची महत्त्वाची; चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका..

By

Published : Jul 27, 2020, 8:59 PM IST

Updated : Jul 27, 2020, 9:50 PM IST

कोल्हापूर - रामजन्मभूमी मुक्त होण्यासाठी ५०० वर्षे संघर्ष करावा लागला. मात्र, शिवसेना कायमच यासाठी काहीही न करता रामजन्मभूमी मुक्त करण्यासाठी आमचा मोठा वाटा असल्याचा दावा करत आली आहे. अशी खरमरीत टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर केली. ते कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागणी केलेल्या रामजन्मभूमीच्या ई-भूमीपूजनाच्या मुद्द्यावरून त्यांनी शिवसेनेला लक्ष केले.

ते पुढे म्हणाले, देशातील तमाम हिंदू भक्तांचा एक रोमांचकारी प्रसंग असताना, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ३०० नावे रामजन्मभूमीच्या भूमीपूजनाच्या सोहळ्याला आमंत्रित करण्यात आली आहेत. त्यामुळे यात विरोध करण्याचे कारण नाही. उलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीच मोठी अडचण निर्माण झाली आहे. कारण सत्तेत असणाऱ्या सहयोगी पक्षाचे काय मत आहे, हे जाणून घेणे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. त्यांना जायचे का नाही, हे त्यांनी ठरवावे. हिंदुत्वापेक्षा ठाकरेंना खुर्ची महत्वाची आहे.

ठाकरेंना हिंदुत्वापेक्षा खुर्ची महत्त्वाची; चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका..

यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या आजच्या सुनावणी वरून राज्य सरकारला लक्ष केले. अनेक मराठा समाजातील तरुण आजच्या निकालाकडे लक्ष ठेवून होते. मात्र आजच्या निकालावरून मराठा समाजातील मुलांची झोप उडाली आहे. याबाबत पुरेशी माहिती आम्हाला सरकारने दिली नसल्याचे सरकारच्या वकिलांनी सांगितले. त्यामुळे आम्हाला सुनावणीची तारीख वाढवून द्या, अशी मागणी वकिलांनी केली असल्याचे आमदार पाटलांनी सांगितले. वकिलांनी असे म्हणणे ही बाब धक्कादायक असून, शनिवारी सर्व तयारी झाल्याचे का घोषित केले? असा सवाल आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पाटलांचा सरकारवर निशाणा..

वारंवार सांगून देखील राज्य सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही. राज्यातील 32 टक्के मराठा समाजातील मुलामुलींच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. याला सहजपणे घेऊ नका असंही पाटील म्हणाले. वेळ पडली तर मागास आयोगाच्या अध्यक्षाची मदत घ्या, त्यांना विनंती करून आपल्या वकिलांना पूर्ण कल्पना द्या. आपली बाजू कशी स्पष्ट करता येईल हे सांगण्याचा प्रयत्न करा. मात्र राज्य सरकारची कोणतीच पूर्वतयारी दिसून येत नाही.आता जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत मराठा आरक्षण गृहीत धरून नोकर भरती करता येणार नाही, असेही आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच सरकार हा मुद्दा गांभीर्याने घेत नसल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा :प्रतिदिन साडेचार हजारांच्या पुढे रुग्णालयाला खर्च आकारता येणार नाही - आरोग्यमंत्री

Last Updated : Jul 27, 2020, 9:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details