कोल्हापूर- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजातील काही जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. समाजासाठी बलिदान दिलेल्या ४२ जणांच्या वारसदाराला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये नोकरी देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात दिले.
बलिदान दिलेल्या 'त्या' ४२ जणांच्या वारसदारांना एसटीत नोकरीसाठी प्रयत्न करू - चंद्रकांत पाटील - kolhapur
मराठा समाजाला आरक्षण निर्णयानंतर कोल्हापुरात कृतज्ञता सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विविध आश्वासने दिली.
कृतज्ञता सत्कार समारंभावेळी उपस्थित मान्यवर
मराठा समाजाला आरक्षण निर्णयानंतर कोल्हापुरात कृतज्ञता सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. पाटील पुढे म्हणाले, दर आठवड्याला बैठक घेऊन मराठा आरक्षणातील केसेस मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांसह जिल्ह्यातील राजकीय नेते, आमदार, खासदार आणि सामाजिक नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.