महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रकांत पाटलांसह गिरीश महाजनांनी केली कोल्हापूरच्या पूरस्थितीची पाहणी

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज कोल्हापूरच्या पूरपरिस्थितिची पाहणी केली. पाटील यांनी प्रशासन आपल्या परीने संपूर्ण प्रयत्न करत आहे. लवकरच सर्वच नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येईल अशी ग्वाही दिली.

चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांनी केली कोल्हापूरच्या पुरस्थितीची पाहणी

By

Published : Aug 7, 2019, 9:48 PM IST

कोल्हापूर - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी पाण्यात अडकलेल्या नागरिकांनी वेळेत मदत न पोहोचल्याची खंत व्यक्त केली. यावर महसूलमंत्री पाटील यांनी प्रशासन आपल्या परीने संपूर्ण प्रयत्न करत आहे, लवकरच सर्वच नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांनी केली कोल्हापूरच्या पुरस्थितीची पाहणी

कोल्हापुरात आलेल्या पुरामध्ये काही नागरिक गेल्या दोन दिवसांपासून घरातच अडकून पडले होते. मात्र त्यांच्यापर्यंत बचाव पथके पोहोचलीच नाहीत. त्यानंतर काही सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांकडून आम्हाला मदत मिळाल्याची माहिती येथील पूरग्रस्तांना पाटील यांना दिली. गेले ६-७ दिवस कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.

पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर शहरातील सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेकजण घरांमध्ये अडकले आहेत.यावर या सर्व पूरग्रस्तांपर्यंत लवकरच मदत पोहोचेल अशी ग्वाही पाटील यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details