महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

KOLHAPUR ASSEMBLY ELECTION अमल महाडिक 'अशी' मारणार बाजी; चंद्रकांत पाटलांनी सांगितले कॅलक्युलेशन - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, की 208 मते मिळविणारे निवडणुकीत जिंकणार आहेत. मात्र ,आम्हाला आता 165 च्या पुढे केवळ 43 इतकीच मते मिळवायची आहेत. मात्र, 43 च्या मते आम्ही कशी मिळवणार हे थोडीच माध्यमांना सांगणार आहोत. या निवडणुकीत अमल महाडीकांचा विजय होईल याबाबत कोणतीही शंका नाही.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

By

Published : Nov 19, 2021, 6:59 PM IST

Updated : Nov 19, 2021, 7:56 PM IST

कोल्हापूर- विधान परिषदेची निवडणूक (Kolhapur assembly election) येत्या 10 डिसेंबर रोजी होणार आहे. भाजपचे अमल महाडिक (BJP candidate Amal Mahadik in election) ही निवडणूक कशी जिंकणार, याबाबतची अंदाजित आकडेवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितली. विधानपरिषद निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथे आवाडे गटाचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे सतेज पाटील (congress leader Satej Patil) आणि भाजपचे अमल महाडिक यांच्यात लढत होणार आहे. नुकतेच सतेज पाटलांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी आपल्याकडे 270 च्या आसपास मतदार असल्याचा दावा केला आहे. याबाबतच बोलताना चंद्रकांत पाटलांनी हा पोकळ दावा असल्याचे म्हटले आहे.

चंद्रकांत पाटलांनी सांगितले कॅलक्युलेशन

हेही वाचा-ST Workers Strike : एसटी कामगारांच्या संपात भाजपचा हात; चंद्रकांत पाटलांची कबुली

सतेज पाटलांकडे काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना मिळून केवळ 118 मतदार

यावेळी बोलतानाचंद्रकांत पाटीलम्हणाले, प्रत्येक जण आपणच जिंकणार असा दावा करणारच आहे. सतेज पाटलांनी सुद्धा 270 मतांचा दावा केला. कदाचित त्यांना 416 म्हणायचे असेल, असा टोलाही त्यांनी लगावला. केवळ काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक आलेले 35 जण आहेत. मात्र, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र केली तर त्यांचा आकडा 118 वर पोहोचतो. तेच जर भाजपचा विचार केला तर फक्त भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक आलेले 105 जण आहेत. त्यात जर विनय कोरेंच्या जनस्वराज्य आणि आवाडे यांच्या ताराराणी आघाडीची मते जोडली तर ती 165 होतात. त्यामुळे त्यांच्यापेक्षाही अधिक मते आपल्याकडे आहेत. त्यामुळे जिंकण्यासाठी पुढे आणखी जेवढी मते लागणार आहेत. ती कोण घेणार? यावर ही निवडणूक अवलंबून असल्याचे पाटील म्हणाले.

हेही वाचा-राजकारणाचे गुन्हेगारीकरण करणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र संघर्ष करा - चंद्रकांत पाटील



208 मते मिळविणारा असेल विजयी

पुढे भाजपचे प्रदेशाध्यक्ष (Chandrakant Patil over Kolhapur Assembly Election) म्हणाले, की 208 मते मिळविणारे निवडणुकीत जिंकणार आहेत. मात्र ,आम्हाला आता 165 च्या पुढे केवळ 43 इतकीच मते मिळवायची आहेत. मात्र, 43 च्या मते आम्ही कशी मिळवणार हे थोडीच माध्यमांना सांगणार आहोत. या निवडणुकीत अमल महाडीकांचा विजय होईल याबाबत कोणतीही शंका नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा-Chandrakant Patil : राज्यात झालेल्या दंगलीचा निषेध म्हणून भाजपाचे २२ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन - चंद्रकांत पाटील
कोल्हापूरात शिवसेना यापुर्वी केव्हाही भाजपसोबत नव्हती

गतवेळच्या निवडणुकीवेळी शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष (Chandrakant Patil Slammed Shivsena over Kolhapur election) एकत्र होते. तरीही त्यावेळी काँग्रेसच्या सतेज पाटलांचा विजय झाला. याबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेना कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपसोबत नसते. महानगरपालिका, जिल्हा परिषद किंव्हा इतर कोणत्याच निवडणुकीत सेना भाजपसोबत नसते, असा चंद्रकांत पाटलांनी सेनेवर आरोप केला.

Last Updated : Nov 19, 2021, 7:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details