महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोविड रुग्णालयांमध्ये आता सीसीटीव्ही, जिल्हाधिकारी दौलत देसाईंची माहिती - कोव्हिड रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार असून, रुग्णांवर योग्य उपचार होण्यासाठी याचा वापर होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

CCTV cameras will install in Covid  hospitals in kolhapur
कोव्हिड रुग्णालयांमध्ये आता सीसीटीव्ही

By

Published : Jul 5, 2020, 6:31 PM IST

कोल्हापूर - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार असून, रुग्णांवर योग्य उपचार होण्यासाठी याचा वापर होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. त्याचबरोबर देखरेख समिती आणि टास्क फोर्स भेट देऊन योग्य उपचार तसेच नियोजन होते की नाही याचे नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय नियमीत तपासणी व देखरेख समितीची स्थापना करण्यात आली. शिवाय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. या दोन्ही समितीची आज जिल्हाधिकारी कार्यायलयात बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.


यावेळी जिल्हाधिकारी देसाई म्हणाले की,कोविड रुग्णालय सीपीआर तसेच डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयामध्ये कोविडचा रुग्ण उपचार घेत आहे. अतिदक्षता विभाग किंवा वॉर्ड अशा ठिकाणी सीसीटीव्ही बसवणे. याचे फुटेज उपचार करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरर्स तसेच प्रशासन यांना उपलब्ध करुन देणे. या माध्यमातून रुग्णांवर योग्य उपचार होतो का नाही हे पाहिले जाईल. ही समिती विविध रुग्णालयांना अचानक भेटी देऊन देखरेख करेल.तसेच कोव्हिड रुग्णांचे व्यवस्थापन योग्य होते की नाही यावरही नियंत्रण ठेवेल. वेळोवेळी त्यात सुधारणा करुन मृत्यूदर कमी ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे.

अधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्स कोविड रुग्णांवरील उपचारासाठी प्रोटोकॉल तयार करुन या पध्दतीने उपचार होतो का नाही हे पाहणं, उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सल्ला देणं हे या समितीचे कार्य आहे. यामधून मृत्यूदर कमी करणं हाही उद्देश आहे. अतिदक्षता विभागात असणारे रुग्ण, अतीगंभीर रुग्णांबाबत योग्य उपचार दिला जातो का नाही याबाबत विचार विनीमय करुन तपासणी करेल.

जिल्ह्यातील इतर कोव्हिड रुग्णालय, कोविड काळजी केंद्र या ठिकाणीही प्रोटोकॉलप्रमाणे उपचार होतो की नाही, लवकर उचारासाठी आणले जाते की नाही याबाबतसुद्धा ही समिती उपाययोजना सुचवणार आहे. याबाबत आवश्यकतेनुसार शासनाकडेही या उपाययोजना सुचवून त्याबाबत प्रशासकीय कार्यवाही करुन सोयीसुविधा उपलब्ध करता येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details