कोल्हापूर : Cat Show in Kolhapurदेशभरातील मांजर प्रेमींमध्ये मुंबई, चेन्नई, बंगळुरू, कोची हैदराबाद अशा मेट्रो शहरांचा सहभाग दिसतो. यामध्ये मांजर प्रेमींकडून देश- विदेशातील मांजरांचं प्रदर्शन दरवर्षी भरवलं जातं. विशेषत: लोक श्वान मोठ्या प्रमाणात पाळतात त्याचप्रमाणे आता मांजरीही घरात पाळली जातात. त्यांची स्वच्छता आणि त्यांच्या पालकांचे प्रबोधन याविषयी माहिती देण्यासाठी देशभरात कॅट शोचं आयोजन मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. कोल्हापुरातही गेल्या पाच वर्षात तिसऱ्यांदा कॅट शो आयोजित करण्यात आला असून फ्लाईंग क्लब ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीनं 2019 या वर्षात पहिल्यांदाच कोल्हापुरात कॅट शो झाला होता. यावेळी मांजर प्रेमी पालकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे देशभरातील मांजर प्रेमी ही अचंबित झाले होते. यामुळेच गेल्या पाच वर्षात कोल्हापुरात तीन वेळा कॅट शोचं आयोजन करण्यात आलं आणि याला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या प्रजातींची मांजरं आकर्षणाचा केंद्र : जगभरातील सर्वाधिक मांजरप्रेमींना आवडणारी पर्शियन कॅट, क्लासिक लाँग हेअर, बेंगाल कॅट, मेनकुन, ब्रिटिश शॉर्ट हेअर, एक्झॉटिक शॉर्ट कॅट, सैबेरियन कॅट, सियामिस, ओरीवो, भारतीय जातीचे इंडी माऊ, अशा विविध जातीची आणि बघणाऱ्याला हवीहवीशी वाटणारी ४०० हून अधिक मांजरे या प्रदर्शनात (कॅट शो) सहभागी झाली होती.