कोल्हापूर- कोरोना संदर्भात काही समाजकंटकडून खोडसाळपणे आणि जाणीवपूर्वक चुकीच्या पोस्ट, ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ व्हायरल केल्या जात आहेत. इचलकरंजी मधील आयजीएममध्ये सुविधांबाबत कोणताही गैरप्रकार घडला नसून, केवळ खोडसाळपणे ऑडिओ क्लिप करून व्हायरल केल्याचे उघड झाले आहे. ऑडिओ क्लिप मधील रुग्णाने केलेल्या आरोपाबाबत कोणतेही तथ्य नाही आहे. आपत्ती कायद्यानुसार एकावर गुन्हा नोंद केला असल्याचे माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील मुसळे येथील कोरोना सेंटरमधील रुग्णाचं मित्रासोबत बोलणं झालेली ऑडिओ क्लिप दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. या क्लिपची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. याबाबत माहिती देताना देशमुखांनी स्पष्टीकरण दिले. तसेच जाणीवपूर्वक असे प्रकार कोण करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा यावेळी दिला आहे.