महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बलिंगा येथील जमीन प्रकरणी २ तहसीलदारांसह १७ जणांवर गुन्हा दाखल - कोल्हापूर

बालिंगा येथील तक्रारदार शांताराम श्रीपती माळी यांनी तत्कालीन तहसीलदार व अन्य संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्याकडे धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांसह १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करवीर पोलीस ठाणे

By

Published : Feb 20, 2019, 2:19 PM IST

कोल्हापूर- करवीरचे तत्कालीन तहसीलदार योगेश भीमराव खरमाटे व उत्तम विठ्ठल दिघे यांच्यासह १७ जणांवर जमिनीची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र माळी यांच्या मालकीची बालिंगा येथे जमीन आहे. तहसीलदार खरमाटेसह संशयितांनी सहहिस्सेदार रामचंद्र माळी यांच्या नावे असलेली बनावट वटमुखत्यारपत्राच्या आधारे दस्त नोंदवला. आपल्या मालकीच्या जागेवर परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माळी यांनी संशयितांविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार सर्वांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बालिंगा येथील तक्रारदार शांताराम श्रीपती माळी यांनी तत्कालीन तहसीलदार व अन्य संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्याकडे धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांसह १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा नोंद झालेल्यांची नावे

१) बालिंगा येथील मंडलाधिकारी शंकर नांगरे
२) तलाठी शरद मारुती नलवडे
३) भूमी अभिलेख उपअधीक्षक पल्लवी शिरकोळे
४) जिनगोंडा यशवंत पाटील
५) आशा जिनगोंडा पाटील
६) मुवर रशीद पठाण, सांगली
७) वैष्णवी हरीश राणे
८) संजय शिवाजीराव पवार
९) प्रदीप पांडुरंग इंगवले
१०) उमेश राजाराम झंजे
११) सरिता दिनकर माने
१२) दीपक रत्नाकर माने
१३) इंद्रजीत बाबुराव पाटील
१४) बाबुराव सिताराम पाटील
१५) कुंभार
१६) करवीरचे तहसीलदार योगेश भीमराव खरमाटे
१७) उत्तम विठ्ठल दिघे

ABOUT THE AUTHOR

...view details