कोल्हापूर : शासनाला पूर्वकल्पना देऊन काल (सोमवार) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर रॅली काढली होती. शिवाय याला पोलिसांकडून परवानगी सुद्धा नकारण्यात आली नव्हती, असे असताना स्वाभिमानीच्या या ट्रॅक्टर रॅलीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकीकडे सांगली आणि कोल्हापूरमध्ये पालकमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहे थोरात यांच्या उपस्थितीमध्ये मोठे कार्यक्रम पार पडले. मात्र दुसरीकडे सर्वसामान्य माणसांवर असे गुन्हे का? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. जर आमच्यावर गुन्हे दाखल करता तर त्यांच्यावर का गुन्हा दाखल नाही? असा सवालही त्यांनी केला असून काँग्रेस यामुळेच रसातळाला गेली असल्याची टीकाही शेट्टींनी यावेळी केली.
स्वाभिमानीच्या ट्रॅक्टर मोर्चाविरोधात गुन्हा दाखल; शेट्टींनी व्यक्त केली संतप्त प्रतिक्रिया - राजू शेट्टी न्यूज
सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर मोर्चा पोलिसांना पूर्व कल्पना देऊन काढण्यात आला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यात आले. दुसरीकडे राजकीय नेत्यांचे कार्यक्रम पार पडले. त्यांच्यावर मात्र गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. केवळ सर्वसामान्य नागरिकांच्यावर पोलीस अशाप्रकारे गुन्हे दाखल करत असतील, तर त्यांची कीव वाटते, अशी संतप्त प्रतिक्रिया सुद्धा यावेळी राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.
![स्वाभिमानीच्या ट्रॅक्टर मोर्चाविरोधात गुन्हा दाखल; शेट्टींनी व्यक्त केली संतप्त प्रतिक्रिया case Filed against swabhimani shetkari sanghatanas tractor Rally in kolhapur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10386163-321-10386163-1611646965022.jpg)
स्वाभिमानीच्या ट्रॅक्टर मोर्चाविरोधात गुन्हा दाखल; शेट्टींनी व्यक्त केली संतप्त प्रतिक्रिया
राजू शेट्टी बोलताना...
सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर मोर्चा पोलिसांना पूर्व कल्पना देऊन काढण्यात आला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यात आले. दुसरीकडे राजकीय नेत्यांचे कार्यक्रम पार पडले. त्यांच्यावर मात्र गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. केवळ सर्वसामान्य नागरिकांच्यावर पोलीस अशाप्रकारे गुन्हे दाखल करत असतील, तर त्यांची कीव वाटते, अशी संतप्त प्रतिक्रिया सुद्धा यावेळी राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. दरम्यान, यामुळेच काँग्रेस रसातळाला गेली आहे. राहिलेले अवशेष तरी जपा नाहीतर ते सुद्धा संपून जाईल, अशी टीका सुद्धा शेट्टींनी केली.
सांगली ते कोल्हापूर विराट ट्रॅक्टर रॅली
नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात काल सोमवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर रॅली पार पडली. सांगलीतील विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात झाली होती. मोर्चाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद इतका मोठा होता परिणामी सांगलीतून निघालेली ट्रॅक्टर रॅली तब्बल 8 तासांनंतर कोल्हापूरात पोहोचली.