महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Witchcraft in Kolhapur: कोल्हापुरात जादूटोणा, भानामतीचा प्रकार; छापा टाकून महिलेला अटक

जादूटोणा कायद्याचे उल्लंघन ( Witchcraft in Kolhapur ) करत खुलेआम भानामती आणि जादूटोण्यासाठी लोकांना फसवणाऱ्या एका महिलेस पोलिसांनी अटक केली आहे. सृष्टी राजेश मोरे, असे या महिलेचे नाव आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी येथे असलेल्या सृष्टीमय ज्योतिष कार्यालयावर छापा टाकून कारवाई केली आहे. यापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबतचे स्टिंग ऑपरेशन ( Sting Operation ) केले होते. त्यानंतर दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांची धाड टाकून ही कारवाई केली आहे.

आरोपीसह पोलीस
आरोपीसह पोलीस

By

Published : Feb 3, 2022, 8:59 PM IST

कोल्हापूर - जादूटोणा कायद्याचे उल्लंघन ( Witchcraft in Kolhapur ) करत खुलेआम भानामती आणि जादूटोण्यासाठी लोकांना फसवणाऱ्या एका महिलेस पोलिसांनी अटक केली आहे. सृष्टी राजेश मोरे, असे या महिलेचे नाव आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी येथे असलेल्या सृष्टीमय ज्योतिष कार्यालयवर छापा टाकून कारवाई केली आहे. यापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ( Superstition Elimination Committee ) पदाधिकाऱ्यांनी याबाबतचे स्टिंग ऑपरेशन ( Sting Operation ) केले होते. त्यानंतर दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांची धाड टाकून ही कारवाई केली आहे.

माहिती देताना स्मीता पाटील

काय आहे नेमकं प्रकरण ? -कोल्हापूरच्या शाहूपुरीतील 6 व्या गल्लीत सृष्टी ज्योतिष कार्यालय आहे. याठिकाणी गेल्या काही दिवसांपासून भानामती तसेच जादूटोणा सुरू असून अनेकांची लूट सुरू असल्याच्या घटना घडल्या होत्या. हा प्रकार कोल्हापुरातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी स्वतः या ठिकाणी जाऊन स्टिंग ऑपरेशन केले. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार त्यांनी कोल्हापूर पोलिसांना सांगितला. त्यानुसार आज (दि. 3 फेब्रुवारी) पोलिसांनी या सृष्टी ज्योतिष कार्यालयावर धाड टाकून येथील चालक सृष्टी राजेश मोरेला अटक केली आहे. शाहूपुरी पोलिसांनी जादूटोणा आणि भानामतीसाठी लागणारे सर्व साहित्य तसेच या प्रकारासाठी घेतले गेलेले पंधरा हजार रुपयेही पोलिसांनी जप्त केले आहेत.

गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू -दरम्यान, सृष्टी मोरेला पोलिसांनी अटक करून शाहूपुरी पोलीस ठाणे ( Shahupuri Police Station ) येथे आणले असून तिच्यावर जादूटोणा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गीता हसुरकर आणि सीमा पाटील यांच्या पुढाकारातून ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईत शाहुपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील यांच्यासह पोलीस हवालदार तानाजी चौगले, अनिकेत डोंगळे, महेश नाईक, वनिता घार्गे, सुप्रिया चौगुले, सुशील सावंत यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा -कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी आता कृती समितीची आरपारची लढाई सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details