महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

By-Polls In Kolhapur North : कोल्हापूर उत्तरमध्ये पोट निवडणुक; भाजपकडून इच्छूकांच्या मुलाखती - By-Polls In Kolhapur

कॉंग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक 12 एप्रिलला होत आहे. (By-Polls In Kolhapur North) भाजपाने ही निवडणूक लढणार असल्याची भूमिका घेतल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता नाही.

भाजपकडून इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती
भाजपकडून इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती

By

Published : Mar 15, 2022, 7:14 AM IST

कोल्हापूर - उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला असून आता राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या हालचालींनाही वेग आला आहे. (By-Polls In Kolhapur North) भाजपने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. कॉंग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक 12 एप्रिलला होत आहे. भाजपाने ही निवडणूक लढणार असल्याची भूमिका घेतल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता नाही.

व्हिडिओ

महेश जाधव यांचे शक्ती प्रदर्शन

भाजपाच्या वतीने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून यामध्ये पाच जणांनी मुलाखत दिले आहेत. तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत मुलाखतीसाठी दाखल झाले होते. (Congress MLA Chandrakant Jadhav) तर, ही निवडणूक भाजप सर्व ताकद पणाला लावून लढवणार असल्याचेही भाजपचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी सांगितले आहे.

ही निवडणूक भाजप लढणार

दिवंगत काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर पोट निवडणूक लागली असून 12 एप्रिलला निवडणुका होणार आहेत. (By-Polls BJP has interviewed aspirants) यामुळे प्रशासन आता कामाला लागले आहे. तर, दुसरीकडे राजकीय पक्ष देखील रणनीती आखत आहेत. भाजपने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. पाच जणांनी मुलाखती दिल्या आहेत.

केंद्रीय कमिटी उमेदवार जाहीर करणार

यामध्ये नगरसेवक सत्यजित कदम हे कोल्हापूर उत्तरसाठी प्रबळ दावेदार मानले जात असले तरी सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेऊन अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्रीय कमिटी उमेदवार जाहीर करणार असल्याचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी सांगितले. तर, ही निवडणूक बीनविरोध होणार नसल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडीच्या कामामुळे नागरिकांमध्ये प्रंचड रोष आहे. हा रोष व्यक्त करण्यासाठी नागरिकांना ही संधी असून कोणत्याही परस्थितीमध्ये ही निवडणूक होणार असही ते यावेळी म्हणाले आहेत.

•कोल्हापूर उत्तर पोट निवडणूकीसाठी असा आहे कार्यक्रम:

•अधिसूचना - गुरुवार १७ मार्च २०२२
•नामनिर्देशनाचा अखेरचा दिवस - गुरुवार २४ मार्च २०२२
•अर्ज छाननी - शुक्रवार २५ मार्च २०२२
•अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस - सोमवार २८ मार्च २०२२
•मतदान - मंगळवार १२ एप्रिल २०२२
•मतमोजणी - शनिवार १६ एप्रिल २०२२

हेही वाचा -New Wards Will be Formed : स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या प्रभाग रचना रद्द, नव्याने होणार प्रभाग रचना

ABOUT THE AUTHOR

...view details