कोल्हापूर - तिलारी घाटात बस अपघाताचा थरार बघायला मिळाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने तब्बल 500 फूट खोल दरीत बस कोसळता कोसळता थांबली. तिलारी घाटातील जयकर पॉईंट येथे ही घटना घडली. मातीच्या ढिगार्यामुळे ही बस थांबली.
नशिब बलवत्तर म्हणून वाचले 45 प्रवाशांचे प्राण; तिलारी घाटात पाचशे फुट दरीत कोसळण्यापासून वाचली बस - कोल्हापूरात बसचा अपघात लेटेस्ट बातमी
कोल्हापूर-पणजी या बसला हा अपघात झाला आहे. बसमध्ये 40 प्रवासी होते. तिलारी घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. मात्र, मातीच्या ढिगाऱ्यामुळे ही बस दरीत कोसळता कोसळता थांबली.
कोल्हापूरात बसचा थरार
कोल्हापूर-पणजी या बसला हा अपघात झाला आहे. बसमध्ये 40 प्रवासी होते. तिलारी घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. मात्र, मातीच्या ढिगाऱ्यामुळे ही बस दरीत कोसळता कोसळता थांबली. अपघातात 5 जण किरकोळ जखमी झाले आहेत. तर कुठलीही जीवितहानी घडली नाही. यानंतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
हेही वाचा -तुकाराम मुंढेंनी घेतली पालिका कर्मचाऱ्यांची 'शाळा'
Last Updated : Feb 20, 2020, 1:19 PM IST