महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

व्हीआरएस घेऊनही बीएसएनएलचे कर्मचारी कामावर.. ग्राहकांसाठी विनामोबदला देताहेत सेवा - कोल्हापूर बातमी

गेल्या अनेक वर्षांपासून येथील एमडीएफ विभागातील टेलिफोन टेक्निशियन म्हणून काम पाहिलेले वागवेकर सुद्धा निवृत्ती घेतल्यापासून दररोज ठरलेल्या वेळेत कार्यालयात येऊन ठरलेली काम करत आहेत. बीएसएनएलने आजपर्यंत आम्हाला भरपूर दिले आहे. त्यामुळे आमचेही काही कर्तव्य असल्याचे म्हणत ते नित्यनियमाने कामावर येत आहेत.

bsnl-workers-work-without-payment-in-kolhapur
व्हीआरएस घेऊनही बीएसएनएलचे कर्मचारी कामावर..

By

Published : Mar 5, 2020, 12:36 PM IST

Updated : Mar 5, 2020, 5:36 PM IST

कोल्हापूर- बीएसएनएलला इतर कंपन्यांच्या स्पर्धेत टिकून राहण्याचे सध्या मोठे आव्हान आहे. अशातच देशभरासह राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. कोल्हापुरात सुद्धा एकूण 700 कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 500 कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. मात्र, यामुळे बीएसएनलच्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून जवळपास 200 ते 300 कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून विनामोबदला सेवेमध्ये कार्यरत आहेत.

व्हीआरएस घेऊनही बीएसएनएलचे कर्मचारी कामावर.. ग्राहकांसाठी विनामोबदला देताहेत सेवा

हेही वाचा-इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेलाही 'कोरोना'चा फटका, किंमतीत 15 टक्क्यांनी वाढ

गेल्या अनेक वर्षांपासून येथील एमडीएफ विभागातील टेलिफोन टेक्निशियन म्हणून काम पाहिलेले वागवेकर सुद्धा निवृत्ती घेतल्यापासून दररोज ठरलेल्या वेळेत कार्यालयात येऊन ठरलेली काम करत आहेत. बीएसएनएलने आजपर्यंत आम्हाला भरपूर दिले आहे. त्यामुळे आमचेही काही कर्तव्य असल्याचे म्हणत ते नित्यनियमाने कामावर येत आहेत.

मुख्य कार्यालयात जवळपास 100 कर्मचारी काम करत होते पण काही केबिनमध्ये सध्या एक दोन अधिकारी तर काही केबिन बंदच असल्याचे चित्र आहे. पण त्यापैकी काही कर्मचारी स्वेच्छेने दररोज कामावर येत असल्याने याचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होत नसल्याचे उपमहाप्रबंधक अनघा भोसले यांनी म्हंटले आहे.

बीएसएनएल नेहमीच चांगली सेवा देत आले असून सर्वत्र 4g सुरू होईल तेव्हा सर्वात चांगले नेटवर्क म्हणून लोक बीएसएनएलकडे पाहतील असेही निवृत्त अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. कार्यालयातच नाही, तर ग्राहकांच्या कॉल आणि इंटरनेट बाबतच्या तक्रारी सोडविण्यासाठी सुद्धा काही कर्मचारी कार्यरत आहेत. यासाठी कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा सुद्धा करत नसल्याची भावना यावेळी या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

जवळपास 500 कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने उरलेल्या 200 जणांना दूरसंचार निगमचा भार सोसावा लागणार होता. पण निवृत्ती घेतलेल्यांपैकी 200 हून अधिक कर्मचारी दररोज विनामोबदला काम करत आहेत. त्यामुळे त्यांचे कौतुक होत असून बीएसएनएलसोबत असलेल्या त्यांच्या घट्ट नात्याचे दर्शन घडते.

Last Updated : Mar 5, 2020, 5:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details