कोल्हापूर - इचलकरंजी परिसरात खुनाची घटना ताजी असतानाच आणखी एकाचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली आहे. शुभम दीपक कुडाळकर असे खून झालेल्या २६ वर्षीय तरुणाचे नाव आहे. शहापूर येथील विनायक हायस्कूलच्या मागच्या पटांगणावर धारदार शस्त्राने वार करून शुभमचा खून करण्यात आला.
एक महिन्यापूर्वी झाला होता प्रेमविवाह
मिळालेल्या माहितीनुसारशुभम कुडाळकर याचा एक महिन्यापूर्वी प्रेमविवाह झाला होता. इचलकरंजीमधील पार्वती औद्योगिक वसाहत येथे तो नोकरी करत होता. नेहमीप्रमाणे तो मंगळवार पेठेतील आपल्या घरातून कामावर गेला होता. मात्र, रात्री साडेआठच्या सुमारास विनायक हायस्कूलच्या मागील बाजूस असणाऱ्या पटांगणावर रक्ताचा थारोळ्यात पडलेला तरुण एका व्यक्तीला नजरेस पडला. त्या व्यक्तीने हा सगळा प्रकार पोलिसांना कळवला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत शुभमच्या चेहऱ्यावर, डोक्यावर व पाठीवर धारदार शस्त्राने वार केले होते.