महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Son Killed Father in Kolhapur: अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मुलाकडून पित्याची निर्घृण हत्या - मुलाकडून कोल्हापुरात पित्याचा खून

मिळालेल्या माहितीनुसार, मृत भिकाजी वगरे यांचे गावातील महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा त्यांचा मुलगा अजित वगरे याला संशय ( Son Killed Father in Kolhapur ) ध होता. या संशयातून पत्नी तसेच मुलासोबत त्यांचे वारंवार वाद होत होते. एक महिन्यापूर्वी मृत भिकाजी आणि त्याचा मुलगा अजित यांच्यामध्ये याच कारणावरून वाद झाला होता.

मुलाकडून पित्याची निर्घृण हत्या
मुलाकडून पित्याची निर्घृण हत्या

By

Published : Dec 10, 2021, 9:19 PM IST

Updated : Dec 10, 2021, 10:58 PM IST

कोल्हापूर - वडिलांचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मुलाने पित्याचा खून केल्याची ( Son Killed Father in Kolhapur ) धक्कादायक घटना समोर आली आहे. पन्हाळा तालुक्यातील माले येथे ही घटना घडली आहे. वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचे गैरसमजातून मुलाने ( brutal murder of a father by a son ) पित्याच्या डोक्यात लोखंडी फावड्याचा वर्मी घाव घालून खून केला आहे. भिकाजी शंकर वगरे असे या मृत वडिलांचे नाव आहे. तर अजित वगरे असे या संशयित आरोपीचे नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मृत भिकाजी वगरे यांचे गावातील महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा त्यांचा मुलगा अजित वगरे याला संशय होता. या संशयातून पत्नी तसेच मुलासोबत त्यांचे वारंवार वाद होत होते. एक महिन्यापूर्वी मृत भिकाजी आणि त्याचा मुलगा अजित यांच्यामध्ये याच कारणावरून वाद झाला होता.

हेही वाचा-NCP Activist Arrested In Navi Mumbai : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला अटक

आईला मारहाण केल्याने पिता- मुलामध्ये वाद-

गुरुवारी रात्रीही याच कारणावरून त्यांच्या राहत्या घरी त्यांची पत्नी आणि मृत भिकाजी यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी मृत भिकाजी याने पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. त्यावेळी अजित याने आईला कशाला मारहाण करता असे विचारणा केली. त्यावरून अजित आणि भिकाजी यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला गेल्याने मुलगा अजितने रागाच्या भरात वडील भिकाजी यांच्या डोक्यात लोखंडी फावड्याने घाव केला. यामध्ये भिकाजी गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

हेही वाचा-Mumbai Crime : स्किमरच्या सहाय्याने एटीएममधून लंपास केले 2 लाख 65 हजार रुपये


पोलिसांकडून मुलाचा रात्रभर शोध; सकाळी अटक

दरम्यान, अजित वरगे याने आपल्या जन्मदात्या वडिलांचा खून केला होता. तो गुरुवारी रात्रीच उशिरा पसार झाला होता. या घटनेची माहिती कोडोली पोलिसांना मिळताच पोलिसांनी संशयित आरोपी अजित वगरे याचा रात्रभर शोध घेतला. अखेर त्याला सकाळी अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल कुमार डोईजड ( API Shital Kumar Doijad ) करत आहेत.

हेही वाचा-अनैतिक संबंधातून जन्मास आलेल्या बाळाला लोकलमध्ये सोडले; महिलेसह प्रियकर अटकेत

Last Updated : Dec 10, 2021, 10:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details