महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दूध आंदोलन : भाजपाने गोकुळचे टँकर रोखले; आक्रमक आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये झटापट - कोल्हापूर भाजपा दूध आंदोलन झटापट

दूध दरवाढीसाठी भाजपासह मित्रपक्षांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनादरम्यान कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने जाणारे गोकुळचे दूध टँकर आंदोलनकर्त्यांने अडवल्याने काही काळ गोंधळ उडाला. महाविकास आघाडी सरकार निष्क्रीय असल्याची टीका भाजपाचे कार्यकारणी सदस्य व माजी खासदार धनंजय महाडीक यांनी केली.

BJP Translation
भाजपा आंदोलन

By

Published : Aug 1, 2020, 1:23 PM IST

कोल्हापूर - भाजपासह मित्रपक्षांनी पुकारलेला दूध दरवाढ आंदोलनात कोल्हापूमध्ये पोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली. कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने जाणारे गोकुळचे दूध टँकर आंदोलनकर्त्यांने अडवल्याने काही काळ गोंधळ उडाला. महाविकास आघाडी सरकार निष्क्रीय असल्याची टीका भाजपाचे कार्यकारणी सदस्य व माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केली. गाईच्या दूध खरेदीला १० रुपये अनुदान द्यावे, दुधाला सरसकट तीस रुपये दर द्यावा, दूध भूकटीला पन्नास रुपये अनुदान मिळाले पाहिजे, अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली.

कोल्हापूरात भाजपाने दूध टँकर रोखले

आंदोलनकर्त्यांनी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ठाण मारत राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दुधाचे टँकर अडवल्याने पोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये मोठी झटापट झाली. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, या आंदोलनावेळी सामाजिक अंतराचा नेत्यांना व कार्यकर्त्यांना विसर पडला होता.

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भाजपा नेहमी रस्त्यावर उतरण्यास तयार असते. भाजपा व मित्रपक्षांनी केलेल्या मागण्या राज्य सरकारने मान्य कराव्यात, अन्यथा राज्यभर आणखी तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा धनंजय महाडिक यांनी दिला.

राज्यभर शेतकरी संघटनांसह भाजपा व मित्र पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून ठिकठिकाणी निदर्शने सुरू आहेत. पश्चिम महाराष्ट्रात या आंदोलनाचा मोठा परिणाम दिसत असून कोल्हापूर जिल्ह्यातदेखील दूध संकलन बंद आहे. कोल्हापुरातील आंदोलनादरम्यान भाजपा जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, भाजपा महिला जिल्हा अध्यक्षा शौमिक महाडिक, भगवानराव काटे, प्रा. शहाजी कांबळे, उत्तम कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, भुदरगड तालुक्यातील पिंपळगावमध्येही आंदोलन करण्यात आले. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत दूध टँकर अडवून दुधाला खरेदी दरवाढ देण्याची मागणी केली. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष विनायक परुळेकर, उत्तम केसरकर, स्वप्नील केसरकर उपस्थित होते.

आंदोलनात दूध रस्त्यावर ओतू नये, दुग्धाभिषेक करू नये, अशा सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले होते. या आवाहनाला कोल्हापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, त्यांच्या मित्रपक्षांनी या आवाहनाला हरताळ फासत दूध टँकर फोडले आहेत. शिवाय अनेक ठिकाणी दुग्धाभिषेक देखील घातला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details