कोल्हापूर -कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे आता प्रशासन चांगलंचे सावध झाला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने कोल्हापुरात प्रवेश घेण्यासाठी दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश देण्याचा निर्णय ( both vaccination doses mandatory in kolhapur ) घेतला. दोन्ही डोस पूर्ण झाले नसतील तर आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट असल्यास सुद्धा प्रवेश मिळणार आहे. नुकतीच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबत नियमावली जाहीर केली असून आजपासून हा आदेश लागू करण्यात आला आहे.
जिल्ह्यात पुन्हा कडक तपासणी; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई -
दरम्यान, संभाव्य कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे आता देशात पुन्हा एकदा कडक नियमावली बनविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्हा प्रशासन सुद्धा सज्ज झाले असून अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेत नव्या ओमॅक्रोन कोरोना व्हेरिएंट ( New Omicron Corona Variant in South Africa ) आढळलेल्यामुळे संपूर्ण जगात पुन्हा एकदा सतर्कतेच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची आता तपासणी केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा येणार असाल तर आता कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह असायला हवे किंव्हा दोन्ही डोस पूर्ण असणे बंधनकारक आहे. एव्हढेच नाही तर आजपासून अनेक कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. यामध्ये पूर्वीप्रमाणे प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर चा वापर, सोशल डिस्टन्स आदींचे पालन करणे गरजेचे आहे. जे कोणी नियमांचे उल्लंघन करेल त्यांच्यावर कारवाईचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.
शहरात कारवाईला सुरुवात -