महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नेत्रदान चळवळीतून साकारला राज्यातील पहिला 'अंध बांधवांचा बचत गट'; चळवळीला अनेकांचा हातभार - eye donation movement

नेत्रदान चळवळीचा दुसरा टप्पा म्हणून अंध बांधवांच्या हाताला काम मिळावं यासाठी गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळ गावात राज्यातील पहिला अंध बचत गट स्थापन करण्यात आला आहे. पाहूयात अंध बांधवांच्या डोळस कामगिरीची विशेष स्टोरी.

Blind rojgar kendra special story
अंध बांधवांचा बचत गट

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2024, 7:01 PM IST

अंध बांधवांचा बचत गट

कोल्हापूर : नेत्रदान चळवळ सुरू करताना सामाजिक संस्था हा निकष ठेवूनच राज्यातील अनेक नेत्रदान संस्था कार्यरत आहेत. मात्र गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळ गावचे अवधूत पाटील यांनी गडहिंग्लजसह शेजारच्या आजरा, चंदगड भागात प्रबोधन करून सुमारे अकरा वर्षांपूर्वी नेत्रदान चळवळ सुरू केली. चळवळीत सहभागी होणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला ना पद ना कोणत्या स्वरूपाची आर्थिक मदत मात्र तरीही अनेकांनी या चळवळीला हातभार लावला. या भागात गेल्या 11 वर्षांत 96 जणांनी आतापर्यंत मरणोत्तर नेत्रदान केलं आहे. 'गाव करील ते राव काय करील' या म्हणीचा प्रत्यय या भागात येत आहे. एक गाव एक गणपती अशी संकल्पना स्वीकारलेल्या अत्याळ गावात दरवर्षी गणपती उत्सवाच्या निमित्तानं अनेक जण एकत्र येतात. यातूनच नेत्रदान चळवळीला बळ मिळाल्याचं नेत्रदान चळवळीचे संकल्पक अवधूत पाटील यांनी सांगितलं.



राज्यातील पहिला अंध बचत गट : प्रबोधनातून नेत्रदान चळवळ कार्यरत असताना आजरा, गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्यातील अनेक अंध बांधवांशी अवधूत पाटील यांचा जवळचा संबंध निर्माण झाला. यातूनच अंध बांधवांच्या रोजगारासाठी काहीतरी करण्याची संकल्पना पाटील यांना सुचली. यातूनच राज्यातील पहिल्या अंध बचत गटाची स्थापना 17 जुलै 2023 रोजी गडहिंग्लजमधील कचेरी मार्गावर अंधांचे रोजगार केंद्र निर्माण करुन झाली. तीन तालुक्यातील आठ अंध बांधवांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला आहे. गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यातील अंधांसाठी ज्या-त्या तालुक्यात तीन स्वतंत्र दोनदिवसीय स्वयंसिद्धता कार्यशाळा घेण्यात आल्या. मुंबईच्या सागर पाटील यांनी या अंध बांधवांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन कार्यशाळेत एलईडी बल्ब, एलईडी माळा, चार्जिंग बल्ब, ट्यूबलाईट, सोलरच्या वस्तू बनविण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. या प्रशिक्षणातून निर्माण होणाऱ्या वस्तू बाजारात विकल्या जात आहेत. यातून हाती चार पैसे मिळत असल्याचं समाधान मिळत असल्याचं अंधबांधव बाळासाहेब सुतार यांनी सांगितलं.


या गावांनी घेतला सहभाग : आतापर्यंत ९६ लोकांचं मरणोत्तर नेत्रदान झालं आहे. अत्याळ (३३), बेळगुंदी (१३), ऐनापूर (१०), कौलगे (७), गडहिंग्लज शहर (६), सरोळी (३), करंबळी (४), भडगाव (४), नूल (३), शिप्पूर तर्फ आजरा (२), उत्तूर (२), शेंडूर (१), बामणे (१), उंबरवाडी (१), हिरलगे (१), लिंगनूर कसबा नूल (१), बामणे (१), इंचनाळ (१), गिजवणे (१), कडगाव (१) या गावातील एवढ्या व्यक्तींचं नेत्रदान झालं आहे.

हेही वाचा :

  1. राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे भेटीवर नाराजी भोवली; उबाठा जिल्हाप्रमुखाची हकालपट्टी
  2. वायएस शर्मिला यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश; पक्षही केला विलीन
  3. भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो, पण कोणतंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही- जितेंद्र आव्हाड

ABOUT THE AUTHOR

...view details