कोल्हापूर - चंद्रकांत पाटील यांची आज कोल्हापुरात पत्रकार परिषद ( Chandrakant Patil Press in Kolhapur ) झाली या पत्रकार परिषदेत त्यांनी महविकास आघाडीवर निशाणा साधला असून नवाब मलिक यांच्यावर त्यांनी आरोप केले आहेत. 23 फेब्रुवारीला ईडीने चौकशी केल्यानंतर नवाब मलिक यांना अटक केलं. मात्र नवाब यांना अटक केल्यानंतर मुख्यमंत्री आणि शरद पवार साहेब राजीनामा घेतील असं वाटलं होते. मात्र राजीनामा न घेता उलट त्यांची पाठराखण करत आहेत. दाऊद सारख्या व्यक्तीशी संबंध आल्यानंतर राजीनामा घेत नाही याचा अर्थ सरकार देखील त्यांना साथ देतंय असं दिसतंय अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र भाजप गप्प बसणार नाही जो पर्यंत नवाब मलिक यांना उद्धव ठाकरे बोलवून राजीनामा घेत नाहीत तोपर्यंत भाजपचे आंदोलन सुरू राहील असे चंद्रकांत पाटील ( Chandkant Patil About Nawab Malik ) म्हणाले आहेत.
'...तोपर्यंत आम्ही अधिवेशन चालू देणार नाही'
1993 च्या बॉम्बस्फोटाने संपूर्ण मुंबई उडवण्याचा प्रयत्न होता पण त्यात दाऊद यशस्वी झाला नाही. म्हणून ते विदेशात पळून गेले आणि त्यांच्या सोबतींबरोबर देश विरोधी काम करतच आहेत या सर्व कामात असणाऱ्या हसीना पारकरच्या संबधित जमीन दाऊद च्या योजनेनुसार नवाब मलिक यांनी घेतले असून हे सिद्ध झाले आहे.यामुळेच ईडीने कारवाई केलं मात्र भाजपवर आणि न्याय व्यवस्थेवर सगळे टीका का करतात हे कळत नाही.तर आता नवाब मालिकांच्या मुलाला देखील नोटीस गेली आहे त्याच्यावर देखील कारवाई होईल असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी बॉम्बस्फोटानंतर मुंबई वाचवण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र आता त्यांचे चिरंजीव सत्तेसाठी नवाब मालिकांसारख्यांना साथ देत आहेत. त्यामुळे हे सगळे विषय नागरिकांच्या समोर आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच जो पर्यंत नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा ही त्यांनी दिला आहे.