महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Uddhav Thackeray On Bjp : 'भाजपने बनावट हिंदुहृदयसम्राट बनण्याचा प्रयत्न केला'; मुख्यमंत्र्यांची टीका - मुख्यमंत्र्यांची टीका

भाजपने देशात बनावट हिंदुहृदयसम्राट (BJP tried to become a fake Hindu Hridayasamrat) बनण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला. पंतप्रधानपदापासून सरपंच पदापर्यंत केवळ एकच फोटो भाजपकडून वापरला जातोय. त्यामुळे सरपंच कोण आणि पंतप्रधान कोण हेच नेमकं कळत नाही असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि भारतीय जनता पक्षाला लगावला आहे.

Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Apr 10, 2022, 6:01 PM IST

Updated : Apr 10, 2022, 8:28 PM IST

मुंबई:कोल्हापूर उत्तर येथील पोट निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन सभा घेतली. यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी भाजपवर सडकुन टीका केली. हिंदुहृदयसम्राट म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर एकच नाव येते ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. हिंदु अडचणीत असताना कोणाचीही पर्वा न करता बाळासाहेबांनी नेहमीच हिंदूंना मदत केली. भारतीय जनता पक्षाचा भगवा हा खरा भगवान असून त्या भगव्याचा बुरखा फाडला पाहिजे अशी जळजळीत टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

एक झेंडा एक नेता -शिवसेनेने कधीही आपला नेता आणि झेंडा बदलला नाही. 1966 चाली शिवसेनेचा जन्म झाला तेव्हापासून शिवसेनेचा झेंडा आणि त्याचा रंग एकच आहे. शिवसेनेने कधी आपला नेताही बदलला नाही. भारतीय जनता पक्ष आपल्या सोयीप्रमाणे भगवा वापरत आहे त्यामुळे तो खरा भगवा नाही. देशाला हिंदुत्वाची दिशा बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवली. आज भाजपची परिस्थिती पाहिली तर त्यांच्या पक्षांमध्ये अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचे फोटो देखील बॅनर वर दिसत नाहीत. चार राज्यात त्यांनी विजय मिळवला असला तरी महाराष्ट्रात त्यांचे चालणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.

फडणवीसांवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार -शिवसेना आता शिवसेना राहिली नसून जनाब सेना झाली असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता. मात्र हिंदुहृदयसम्राटबाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत आमित शहा यांणी दिलेला शब्द कोणी मोडला याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा करत फडवणीसांना टोला लगावला आहे.

हेही वाचा : राज ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेचा टीझर लॉंच, पवार - राऊतांना मिळणार 'करारा जवाब'

Last Updated : Apr 10, 2022, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details