कोल्हापूर - येत्या 20 जून रोजी विधान परिषदेच्या ( Legislative Council ) जागांसाठी निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्व पक्ष आपले आमदार फुटू नये यासाठी सर्व आमदारांना एकत्र करीत आहेत. भाजप ( BJP ) आणि महाविकास आघाडीमधील शिवसेना ( Shiv Sena ) राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) व काँग्रेसने ( Congress ) आपापल्या आमदारांना मुंबईतील वेगवेगळ्या हॉटेलमधे ठेवणार आहेत. काँग्रेसच्या सर्व आमदारांना येत्या दोन ते चार दिवसात मुंबई मध्ये हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे. येत्या दोन दिवसात सर्व आमदारांना एकत्र करण्यात येणार आहे आणि त्यांना निवडणुकीचे प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकासआघाडी मध्ये समन्वय होता मात्र अपक्ष उमेदवारांची मते समजली नसल्याने आम्हाला फटका बसला अशी कबुलीही सतेज पाटील यांनी दिली. सध्या भाजपच्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी असून याचा परिणाम निवडणुकीमधून दिसेल म्हणून सर्व काही आलबेल आहे असे भाजपने समजू नये असे सतेज पाटील म्हणाले आहेत.
सर्व आमदारांना मुंबईत एकत्र आणणार -विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्व आमदारांना मुंबईत हजर राहण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. सध्या राहुल गांधी यांच्यावर ईडीची कारवाई सुरू असून या विरोधात सर्व आमदार आंदोलनात व्यस्त आहेत त्यामुळे येत्या दोन दिवसात सर्व आमदारांना मुंबईत एकत्र करण्यात येणार असून यावेळी त्यांना निवडणुकीचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत महा विकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नसल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे मात्र महा विकास आघाडी मध्ये समन्वय नव्हता हे चुकीच आहे. आमच्यामध्ये प्रचंड समन्वय होता मात्र मतदानाच्या वेळी अपक्ष आमदारांची मतेही पाहता येत नव्हती यामुळे तेथे घोळ झाला आणि आम्हाला याचाच फटका बसला आहे.