कोल्हापूर - केंद्र सरकारने इंधन दरवाढ कमी केली. असे असताना राज्य शासनाने मात्र पेट्रोल डिझेल दर कपात न केल्याच्या निषेधार्थ आज ( सोमवारी ) कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये महाविकास आघाडी सरकार ( BJP Agitation against Mahavikas Aghadi government ) विरोधात भाजपाने भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही पेट्रोल डिझेलचे ( Petrol diesel price hike issue ) दर राज्य शासनाने कमी करावे. एकीकडे कर्नाटकात 10 रुपये प्रति लिटर पेट्रोल डिझेल स्वस्त आहे. मग महाराष्ट्रात हे दर का लागू होत नाहीत ? असा सवाल यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे ( BJP district president Samarjit Singh Ghatge ) यांनी उपस्थित केला. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
BJP Agitation Kagal : इंधन दरवाढ विरोधात भाजपाचा निषेध मोर्चा; राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी - भाजपा कागल मोर्चा कोल्हापूर
कागलमध्ये महाविकास आघाडी सरकार ( BJP Agitation against Mahavikas Aghadi government ) विरोधात भाजपाने भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही पेट्रोल डिझेलचे ( Petrol diesel price hike issue ) दर राज्य शासनाने कमी करावे. एकीकडे कर्नाटकात 10 रुपये प्रति लिटर पेट्रोल डिझेल स्वस्त आहे. मग महाराष्ट्रात हे दर का लागू होत नाहीत ? असा सवाल यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे ( BJP district president Samarjit Singh Ghatge ) यांनी उपस्थित केला.
'कर्नाटकला शक्य झाले महाराष्ट्र सरकार कधी दिलासा देणार?' :केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल दरात कपात करून जनतेसाठी दिलासा दिला. मात्र महाराष्ट्रातील सरकार याबाबत गांभीर्याने निर्णय घेताना दिसत नाही. आज महाराष्ट्र कर्नाटक हायवेवरील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल किंवा पेट्रोल महाराष्ट्र पेक्षा स्वस्त दरात विकत असल्याबाबतचे होर्डिंग लागले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय? असंच म्हणायची वेळ येते, असा सवाल भाजपा जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केला आहे. केंद्र सरकारने दरात कपात केली. त्यानंतर महाराष्ट्राच्या बाजूलाच असलेल्या कर्नाटक राज्याची अंमलबजावणी करत महाराष्ट्र पेक्षा तब्बल दहा रुपये स्वस्त पेट्रोल डिझेल दर केले. मात्र महाराष्ट्र सरकारला अजूनही सर्वसामान्यांची काळजी नाही. त्यामुळे महाविकास सरकारने फक्त पोकळ घोषणा केली. अजूनही प्रत्यक्षात इंधन दरात कपात केली नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे, असेही घाटगे यांनी म्हटले आहे. दरम्यान, जोपर्यंत इंधन दर कमी होत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. वेळ पडल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करु असा इशाराही घाटगे यांनी दिला आहे.
हेही वाचा -Vikhe Patil on Ajit Pawar : अजित पवारांनी पुन्हा आमच्या सोबत यावे - भाजप नेते विखे पाटील