कोल्हापूर -देशांच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी जगभरातील सर्वच देश संरक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च करत असतात. मात्र आपल्या देशाची जागा असून सुद्धा दुसऱ्या देशाची जागा कशाला लागते, असे म्हणत जगात सुद्धा अशा अनेक शक्ती आहेत. ज्यांना सगळे देश सुखाने नांदावेत असे वाटत नसल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. राजकारणात सुद्धा हेच सुरू असल्याचे म्हणत आणि याचाच धागा पकडत चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्याबाबत हेच झालं आहे असे म्हटले आहे. या दोघांना जरी मी कोणताही स्वार्थ न ठेवता एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केला, तर काहीजण ते एकत्र येऊ नयेत यासाठी प्रयत्न करत असतात, असे म्हटले आहे. हे दोन गट एकत्र आले तर आपलं घर कसे चालणार म्हणत अनेकजण प्रयत्त करत असतात, असेही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले. ते कोल्हापुरात बोलत होते.
आजरा तालुक्यातील शहिद जवान ऋषिकेश जोंधळे यांचे स्वतःच्या घराचे अपूर्ण स्वप्न भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पूर्ण करत घर बांधून दिले आहे. आज या निमित्ताने गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, अनेक देश आपापल्या सीमा शाबूत राहाव्यात यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असतात. मात्र काही देश आपल्या देशाची भूमी असून सुद्धा दुसऱ्या देशाची जमीन मिळविण्यासाठी प्रयत्त करत असतात. आपल्या देशाचेच उदाहरण द्यायचे झाले तर आपण भारतातील एक भाग पाकिस्तानला दिला. तेंव्हापासून पाकिस्तानची हाव काय संपलेली नाही. त्यामुळेच जगात सुद्धा अशा अनेक शक्ती आहेत ज्यांना सगळे देश सुखाने नांदावेत असे वाटत नाही. सगळे देश सुखाने नांदले तर अनेकांच्या शस्त्र आणि आदींचा धंदा कसा चालणार म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राजकारणात सुद्धा हेच सुरू असल्याचे म्हटले. हाच धागा पकडत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांचेच उदाहरण यावेळी देत ते म्हणाले की, दोन गट एकत्र येऊ नयेत यासाठी काहीजण नेहमी प्रयत्न करत असतात. जर मी सतेज पाटील आणि धनंजय महाडिक एकत्र यावेत यासाठी प्रयत्त करायला लागलो, तर लगेच काहीजण मध्ये येतील आणि ते दोघे एकत्र येऊ नयेत म्हणून प्रयत्न करतील. दोन्हीकडचे कार्यकर्ते सुद्धा तेच करतील. आपल्या जुन्या पराभवाची आठवण करून देतील आणि पुन्हा त्यांना लांब ठेवतील, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.