महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

..तर तेथेच पवारांची आम्ही पोलखोल करणार, चंद्रकांत पाटलांचा इशारा - कोल्हापूर न्यूज

मराठा आरक्षणाबाबत जनजागृतीसाठी सभा घेणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. यावरून चंद्रकांत पाटलांनी पवारांना इशारा दिला आहे.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

By

Published : Aug 17, 2021, 1:16 AM IST

कोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापले आहे. 'केंद्र सरकारने (Central Government) 50 टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिल केली. तसेच जातीनिहाय जनगणना करून केंद्राकडे असलेला इम्पेरिकल डेटा राज्य सरकारकडे दिला तर समाजातील शोषित पीडितांना आरक्षणाचा लाभ घेता येईल' असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी म्हटले. शिवाय आरक्षणाच्या प्रश्नावरून जनजागृती करण्यासाठी सभा घेणार असल्याचेही पवारांनी सांगितले. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला. 'खोटं बोला पण रेटून बोला' अशी पवार यांची प्रवृत्ती आहे. शिवाय पवार मराठा आरक्षणाबाबत (About Maratha Reservation) जनजागृतीसाठी सभा घेणार असतील तर आम्ही सुद्धा त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी पोलखोल सभा घेऊन पवार कसे समाजासोबत खोटे बोलत आहेत हे दाखवून देऊ, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटलांचा पवारांना इशारा

एकदाच काय ते 'दूध का दूध, पाणी का पाणी' होऊ द्या - चंद्रकांत पाटील

गेल्या 28 वर्षांपासून यांची केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे. मग यांना मराठा आरक्षण द्यायला यांचे हात कोणी बांधले होते? असा सवाल सुद्धा आजच्या पत्रकार परिषदेतून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. 'मराठा आरक्षण द्यायला यांना जमलं नाही म्हणून याचं खापर ते आता दुसऱ्यांवर फोडत आहेत. मराठा आरक्षण प्रश्न आता यांना शेकणार आहे. हे लक्षात आल्यानंतरच हे सर्व दुसऱ्यांवर आरोप करत सुटले आहेत. त्यामुळे आरक्षणासाठी भाजप सरकारने काय केले आणि आताचे सरकार काय करत आहे, हे समजायला मंत्रालयात (In the ministry) एक चर्चा घ्या. त्यामध्ये भाजपकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) येतील आणि इतर सर्वच पक्षांचे प्रमुख नेते या चर्चेत येऊ द्या. ही सर्व चर्चा प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित करावी, म्हणजे 'दूध का दूध आणि पाणी का पाणी' होईल', असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

वयावर कशाला जाता? ज्यांचं वय झालं त्यांनी कशाला बोलायचं? - चंद्रकांत पाटील

प्रलंबित 12 आमदारांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांना (Governor) पत्र लिहिले आहे. याचबरोबर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांनी देखील याबाबत राजभवनावर जाऊन स्वतः राज्यपालांना पत्र दिले आहे. तरीही राज्यपालांनी राज्य सरकार काहीच बोलत नाही असे म्हटले. याबाबत बोलताना शरद पवारांनी राज्यपालांना टोला लागावत शहाण्याला शब्दाचा मार, पण.. असे म्हणत राज्यपालांच्या वाढत्या वयामुळे त्यांना पत्र वाचता आले नसावे, असा चिमटाही शरद पवार यांनी काढला. याबाबतच बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना टोला लगावला. राज्यपालांच्या वयावर कशाला जाता? ज्यांचे वय झाले आहे त्यांनी यावर कशाला बोलायचं? असे म्हटले आहे. दरम्यान, यावरून 12 आमदारांच्या मुद्द्यावरून अजूनही संघर्ष सुरू असल्याचे दिसून येत आहे. वाचा 12 आमदारांच्या विषयावर मुंबई उच्च न्यायालयाने काय दिलाय निर्णय?

हेही वाचा -BREAKING : राज्यातील मॉल्स रात्री दहा वाजेपर्यंत राहणार खुले, राज्य शासनाची नवी नियमावली जाहीर

ABOUT THE AUTHOR

...view details