महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सीपीआर रुग्णलयातील घटनेची चौकशी करून मृतांना नुकसानभरपाई द्यावी, भाजपाची मागणी - वेदगंगा इमारतीतील ट्रामा केअर सेंटरला आग

सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास सीपीआरच्या वेदगंगा इमारतीतील ट्रामा केअर सेंटरला आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सीपीआर प्रशासनाने स्पष्ट केले होते. मात्र या आगीत सोमवारी तिघांचा व आज सकाळी एकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

bjp-demands-compensation-to-the-deceased-in-incident-at-cpr-hospital-kolhapur
सीपीआर रुग्णलयातील घटनेची चौकशी करून मृतांना नुकसान भरपाई द्यावी, भाजपची मागणी

By

Published : Sep 29, 2020, 5:55 PM IST

कोल्हापूर- सीपीआरमधील ट्रामा केअर सेंटरला आग लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई द्यावी तसेच विद्युत ऑडिट करण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी, अशी मागणी भाजपाने केली आहे.

सीपीआर रुग्णलयातील घटनेची चौकशी करून मृतांना नुकसान भरपाई द्यावी, भाजपची मागणी

सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास सीपीआरच्या वेदगंगा इमारतीतील ट्रामा केअर सेंटरला आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सीपीआर प्रशासनाने स्पष्ट केले होते. मात्र या आगीत सोमवारी तिघांचा व आज सकाळी एकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तसेच महापालिकेच्या अग्निशामक विभागाने सीपीआर इमारतीचे विद्युत ऑडिट करावे, अशी मागणी केली होती; मात्र याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले त्यामुळेच हा प्रकार घडला असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तात्काळ आशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कोल्हापूर भाजपच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, अशोक देसाई यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी सीपीआरमधील कर्मचाऱ्यांची व घटनेतील इतर रुग्णांची विचारपूस करून यातील दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details