महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूरच्या राधानगरीत गवा रेड्यांचा कळप कॅमेऱ्यात कैद

जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्य हे गवा रेड्यांसाठी प्रसिद्ध आहे. राधानगरीच्या अभयारण्यातील जंगल आणि घाटमाथा परिसरात पान तळ्यातील पाणी पातळी सध्या खालावत चालली आहे. यामुळे या गवा रेड्यांना पाणी मिळत नसल्यामुळे हे प्राणी अभयारण्यातून थेट नागरी वस्तीकडे येत आहेत.

By

Published : Mar 31, 2019, 5:41 PM IST

राधानगरी अभयारण्य

कोल्हापूर- जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्य हे गवा रेड्यांसाठी प्रसिद्ध आहे. राधानगरीच्या अभयारण्यातील जंगल आणि घाटमाथा परिसरात पान तळ्यातील पाणी पातळी सध्या खालावत चालली आहे. यामुळे या गवा रेड्यांना पाणी मिळत नसल्यामुळे हे प्राणी अभयारण्यातून थेट नागरी वस्तीकडे येत आहेत.

गवा रेड्यांचा कळप

असाच १० ते १२ गवा रेड्यांचा एक कळप राधानगरीचा मुख्य रस्त्या पार करताना कॅमेऱ्यात कैद झाला. हा कळप अभयारण्यातील घाटमाथ्यावरून पाण्यासाठी शहराजवळ असणाऱ्या पान तळ्याकडे जाताना दिसत आहे. राधानगरीतील निसर्गप्रेमी आणि बायसन नेचर क्लबचे सम्राट केरकर आणि उद्धव मोरे यांनी हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. या व्हिडिओमध्ये दहा ते बारा गवा रेड्यांचा कळप मुख्य रस्ता ओलांडून पान तळ्याकडे जाताना दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details