कोल्हापूर -गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज (दि. 13 एप्रिल) कोल्हापुरातील कागलमध्ये एक अनोखा गृहप्रवेश पार पडला. एकात्मिक विकास गृह योजनेअंतर्गत तब्बल 324 जणांचा हक्काची घरं मिळाली असून त्यांचा आज गृहप्रवेश करण्यात आला. एकात्मिक विकास गृह योजनेअंतर्गत कागलमध्येच घरकुलांची बांधणी करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही योजना रखडली होती. मात्र, आज (मंगळवार) मुश्रीफ यांच्या हस्ते या नव्या घरांसमोर गुढी उभा करुन गृह प्रवेश करण्यात आला. विशेष म्हणजे ज्यांना घरे नाहीत, अशा लाभार्थ्यांना अवघे 50 हजार रुपये भरून 8 ते 10 लाखांपर्यंत किंमत असणारी घर देण्यात आले आहेत. शिवाय आपल्याला हक्काचे घर मिळाल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावरचा आनंदही यावेळी पाहण्यासारखा होता.
कागल नगरपालिकेचा 1 हजार 2 घरांचा प्रकल्प
यावेळी मुश्रीफ म्हणाले, झोपडपट्टी निर्मूलन करून घर बांधून देण्याची केंद्र सरकारची जी योजना होती त्या योजनेअंतर्गत 1 हजार 2 घरं बांधण्याचा प्रकल्प कागल नगरपालिकेने हातात घेतला होता. राज्यातील अनेक नगरपालिकांना हा प्रकल्प पूर्ण करता आला नव्हता मात्र कागल नगरपालीकेच्या माध्यमातून 1 हजार 2 घरांपैकी जवळपास 800 घरांचे वाटप आम्ही पूर्ण केले आहे, असेही मुश्रीफ यांनी म्हटले. शिवाय गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर सर्वांनी गुढ्या उभारून गृहप्रवेश करावा यासाठी आजच्या दिवशी सर्वांचा गृहप्रवेश करण्यात आला असेही ते म्हणाले.
माझ्या जीवनात अनेक आनंदाच्या क्षणांपैकी हा सर्वात आनंदी क्षण