कोल्हापूर- पावनखिंडीमध्ये दारू पीत बसलेल्या वीस ते पंचवीस मद्यपींची शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी चांगलीच दारू उतरवली. पावनखिंड मोहिमेहून परतत असताना काही तरुण येथील पावनखिंड पार्किंग परिसरात पाच ते सहा गाड्यांमध्ये दारू पीत बसले होते. याची माहिती मिळताच शिवराष्ट्रच्या कार्यकर्त्यांनी या सर्वांना बेदम चोप दिला. हे सर्व तरुण करवीर तालुक्यातील रहिवासी आहेत.
व्हिडिओ : पावनखिंडीत दारू पिणाऱ्या मद्यपींना शिवराष्ट्रच्या कार्यकर्त्यांनी दिला बेदम चोप - दारू
पावनखिंड पार्किंग परिसरात पाच ते सहा गाड्यांमध्ये दारू पीत बसले होते. याची माहिती मिळताच शिवराष्ट्रच्या कार्यकर्त्यांनी या सर्वांना बेदम चोप दिला. हे सर्व तरुण करवीर तालुक्यातील रहिवासी आहेत.
शिवराष्ट्र संस्थेची 13 ते 15 जुलै दरम्यान पन्हाळगड पावनखिंड मोहीम होती. 15 जुलैला पावनखिंडमध्ये मोहिमेचा समारोप झाला. समारोप झाल्यानंतर कार्यकर्ते पांढरपाण्याच्या दिशेने जात होते. यावेळी पावनखिंड पार्किंग परिसरात पाच ते सहा गाड्यांमध्ये करवीर तालुक्यातील 20 ते 25 तरुण दारू पीत बसले होते. ही माहिती मिळताच शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गाड्यांची झडती घेतली. दारू पीत बसलेल्या तरुणांना गाड्यांमधून बाहेर काढून लाथा बुक्क्यांनी चांगलाच चोप दिला.
यापुढे अशाप्रकारे पावनखिंड तसेच कोणत्याही किल्ल्यांवर दारू पिणार नसल्याची कबुली या मद्यापींनी दिली. शिवाय अशाप्रकारच्या तरुणांवर नजर राहावी यासाठी पावनखिंड परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे.