कोल्हापूर - पुणे-बंगळुरु महामार्गावरील किणी टोलनाक्याजवळ पोलीस आणि गुन्हेगारी टोळीमध्ये धुमश्चक्री उडाली. यावेळी पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये एका गुन्हेगाराच्या पायाल गोळी लागली आहे. मंगळवारी रात्री उशीरा ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह इचलकरंजीचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे, आदी अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
किणी टोलनाक्याजवळ पोलीस आणि गुन्हेगारी टोळीमध्ये धुमश्चक्री; गोळीबारात एक आरोपी जखमी गुन्ह्यातील आरोपींची नावे -
1) शामलाल गोवरधन वैष्णोई (वय 22 रा. बीयासर, भैयासर, जोधपूर राजस्थान) हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
2) सरवनकुमार मनोहरलाल मान्जु वैष्णोई (वय 24 रा. विष्णुनगर, बाखरी ता. आसीया, जोधपूर राजस्थान) हा आरोपी जखमी झालेला आहे
3) श्रीराम पांचाराम वैष्णोई (वय 23 रा. बटेलाई जोधपूर राजस्थान) हा आरोपी देखील जखमी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगारी टोळी राजस्थान येथील आहे. राजस्थानमधील 25 गुन्ह्यांमध्ये आवश्यक असलेले हे 3 आरोपी आहेत. पोलिसांना चकवा देत हे सराईत गुन्हेगार दोन दिवसापूर्वी धारवाडमध्ये आले होते. याबाबत कर्नाटक पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांना पकडण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी तिथून त्यांनी पलायन केले. यावेळी कर्नाटक व कोल्हापूर पोलिसांनी मिळून या टोळीचा पाठलाग सुरू केला.
कोल्हापूरातील किणी टोल नाक्याजवळ पोहोचल्यानंतर गुन्हेगारांच्या वाहनाला रोखण्याचा प्रयत्न करताच पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिसांनीही गोळीबार केला. यामध्ये एकजण जखमी झाला असल्याची पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी माहिती दिली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून आहे घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली.