महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

OBC Reservation : 'ते दादा आहेत, त्यांच्या विषयी मी काय बोलायच?', बाळासाहेब थोरातांचा चंद्रकांत पाटलांना टोला - बाळासाहेब थोरात ओबीसी आरक्षण प्रतिक्रिया

राज्यात जरी निवडणुका लागल्या तरीही ओबीसी समाजाला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. हा निर्णय घेत असताना सर्व पक्षांचे मत घेऊनच निर्णय घेण्यात आला होता, हे चंद्रकांत पाटील विसरले ( Balasaheb Thorat Criticized Chandrakant Patil ) असतील. ते विरोधी पक्षात आहेत आणि त्यांचे कामच विरोध करणे आहे. ते 'दादा' आहेत, त्यांच्या विषयी काय बोलायचं, असा टोला ही त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

OBC Reservation
OBC Reservation

By

Published : May 5, 2022, 5:36 PM IST

कोल्हापूर- सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेल्या ओबीसी आरक्षणाबाबतच्या ( Supreme Court On OBC Reservation ) दणक्यानंतर राज्य सरकारने आज तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेतली. मात्र, यासंदर्भात जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो राज्य निवडणूक आयोगाला घ्याचा आहे. न्यायालयाने दिलेला निकाल पाहता, त्याची अंमलबजावणी कशी करावी, हे अद्याप समजले नसल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी म्हटले आहे. येत्या ७ जूनपासून मान्सून सुरू होत आहे. मान्सूनमध्ये शेतकऱ्यांची पीक पेरण्याची कामे सुरू असतात आणि अशात निवडणुका कशा घ्यायच्या, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच यावर निवडणूक आयोग योग्य तो अभ्यास करून निर्णय घेईल, असे त्यांनी म्हटले आहे. जरी निवडणुका लागल्या तरीही ओबीसी समाजाला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. हा निर्णय घेत असताना सर्व पक्षांचे मत घेऊनच निर्णय घेण्यात आला होता, हे चंद्रकांत पाटील विसरले ( Balasaheb Thorat Criticized Chandrakant Patil ) असतील. ते विरोधी पक्षात आहेत आणि त्यांचे कामच विरोध करणे आहे. ते 'दादा' आहेत, त्यांच्या विषयी काय बोलायचं, असा टोला ही त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

'ते दादा आहेत त्यांच्या विषयी मी काय बोलायच'- काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका करत राज्य सरकारने ओबीसी समाजाची नेहमीच फसवणूक केली असून पाठीत खंजीर खुपसला असल्याची टीका केली होती. याला थोरात यांनी प्रत्युत्तर दिले असून ओबीसी आरक्षणासंदर्भात जे काही निर्णय आहेत. ते विरोधी पक्षाला सोबत घेऊन चर्चा करून घेतले होते. हे चंद्रकांत पाटील यांना ही माहित असेल. मात्र, ते विरोधी पक्षात आहेत आणि ते विरोधकांचीच भूमिका बजावत आहेत. ते दादा आहेत आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्या बद्दल मला काही बोलायचं नाही, असे ते म्हणाले.

'भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जे योग्य वाटेल ते करू' -निवडणुका झाल्या तर महविकास आघाडी ही एकत्र लढणार का याबाबत बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकार भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच स्थापन झाली आहे. कारण भाजपची कार्यपद्धती तसेच त्यांचे विचार हे आम्हाला मान्य नाहीत. आम्ही सर्वसामान्य माणसाला केंद्रभूत मानून गेली अडीच वर्ष काम करत आहोत. अनेक संकटाना आम्ही यशस्वीरित्या तोंड दिले असून यापुढे ही आम्ही एकत्र काम करणार आहोत आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेव्यासाठी योग्य वाटेल ते करू म्हणत निवडणुका एकत्र लढण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले आहेत. तसेच जो योग्य असेल, तोच मुख्यमंत्री बनेल. महाराष्ट्रात या अगोदर कधीही जातीय राजकारण झाले नाही. या आधी ही वेगवेगळ्या जातीचे मुख्यमंत्री होऊन गेले आहेत. मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचाच नागरिक होईल, असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याला त्यांनी उत्तर दिले आहे.

'भोंग्याचा प्रश्न सामाजिक असेल तर ते सर्वांना लागू होणार' -राज ठाकरे यांच्या भोंग्या संदर्भातील अल्टिमेटम राज्याचं राजकारण चांगलेच तापले आहे. मात्र, राज ठाकरेंनी हा विषय राजकीय नसून सामाजिक असल्याचे म्हटले आहे. भोंग्यांचा विषय हा सामाजिक असेल तर ते सर्वानाच लागू होतो. मग ते कोणत्याही जाती धर्माचा असो. राज ठाकरे यांनी राजकीय दृष्ट्या हा विषय बोलले. मात्र ते आता सामाजिक म्हणत असल्याने तो विषय वाढत असून राज ठाकरे हे भाजपच्या माध्यमातून राजकारण करत आहेत. मात्र, महाराष्ट्राची जनता हुशार असून त्यांनी अशा राजकारणाला योग्य रित्या सामोरे जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -Rana Couple : नवनीत राणांची अखेर सुटका; तपासणीसाठी लीलावती रूग्णालयात दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details