कोल्हापूर - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भविष्य सांगण्यामध्ये चुकत आहेत. त्यांनी आरशासमोर उभे राहावे त्यांना पुढचा विरोधी पक्ष नेता दिसेल, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी आज मुख्यमंत्र्यांना लगावला. मुख्यमंत्री बोलले होते की, विरोधी पक्ष नेताच नसेल आणि आता बोलत आहेत विरोधी पक्षनेता वंचित बहुजन आघाडीचा असेल. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर आज बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना उत्तर दिले. ते जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नूतन सभागृहाच्या उद्घाटन समारंभ आणि विविध कार्यक्रमांसाठी कोल्हापूर दौऱ्यावर होते.
मुख्यमंत्र्यांनी आरशासमोर उभे राहावे, त्यांना पुढचा विरोधी पक्षनेता दिसेल - बाळासाहेब थोरात - मुख्यमंत्र्यांनी आरशासमोर उभे राहावे
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भविष्य सांगण्यामध्ये चुकत आहेत. त्यांनी आरशासमोर उभे राहावे त्यांना पुढचा विरोधी पक्ष नेता दिसेल, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी आज मुख्यमंत्र्यांना लगावला.
यावेळी थोरात म्हणाले, "वंचित बहुजन आघाडी सोबत अजूनही चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर विविध पक्ष संघटना यांच्यासोबतसुद्धा चर्चा सुरू आहेत. त्यामुळे आघाडीचा निर्णय लवकरच घेऊ. आगामी निवडणुका मित्रपक्षांना सोबत घेऊन लढू." विधानपरिषदेतील काँग्रेसच्या विद्यमान आमदारांचे विधानसभेला तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नेमके काय होईल, असे विचारले असता ते म्हणाले, "विधानपरिषदेच्या विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्याबाबत स्क्रिनिंग कमिटीमध्ये निर्णय होईल. विधानपरिषदेचे संख्याबळ टिकवून ठेवणे सुद्धा आमच्यासाठी महत्त्वाचे आहे"