महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या' रिक्षामधून प्रवास केलेल्या नागरिकांनी स्वत:ची तपासणी करुन घ्यावी; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

कोल्हापूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. शाहूवाडी तालुक्यातील उचत येथे बुधवारी आणखी एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा कोरोनाबाधित रिक्षा चालक आहे.

Collector Daulat Desai
जिल्हाधिकारी दौलत देसाई

By

Published : Apr 16, 2020, 1:11 PM IST

कोल्हापूर - राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. कोल्हापूरमध्येही कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. शाहूवाडी तालुक्यातील उचत येथे बुधवारी आणखी एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

हा कोरोनाबाधित एक रिक्षा चालक आहे. 17 ते 24 मार्च या कालावधीत पुणे, मुंबई येथून शाहूवाडीत आलेल्या प्रवाशांना त्याने याच रिक्षामधून सोडले आहे, अशी धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली आहे. त्यामुळे या रिक्षामधून प्रवास केलेल्या नागरिकांनी स्वत:हून आपली वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक नोकरदार कोल्हापूर जिल्ह्यात परत आले आहेत. कोरोनाची लागण झालेल्या रिक्षाचालकाला यातीलच प्रवाशांमुळे कोरोनाची लागण झाली असावी चर्चा आहे.

माहितीसाठी रिक्षा क्रमांक : एमएच-09 इएल 1653

ABOUT THE AUTHOR

...view details