कोल्हापूर - शारदीय नवरात्रौत्सवाची अवघ्या काही तासांत सुरुवात होत आहे. यानिमित्ताने देवस्थान समितीकडून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. नवरात्रौत्सवाच्या पूर्व संध्येला अंबाबाई मंदिर आकर्षक अशा विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. अंबाबाई मंदिर आवारातील दीपमाळा, मंदिराची पाच शिखरे, गरूड मंडप परिसर आणि संपूर्ण मंदिराभोवतीच्या शिल्पाकृतींची स्वच्छता पूर्ण झाली आहे.
घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला नवरंगांमध्ये उजळले अंबाबाई मंदिर - अंबाबाई मंदिर दसरा
देवस्थान समितीकडून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. नवरात्रौत्सवाच्या पूर्व संध्येला अंबाबाई मंदिर आकर्षक अशा विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे.
मुख्य मंदिरातील गाभारा व गर्भकुडीसह महालक्ष्मी यंत्र स्थानाची स्वच्छताही करण्यात आली आहे. उत्सवासाठी मंदिराच्या पाच शिखरांपासून ते दीपमाळा व गरूड मंडपाच्या छतावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे नवरात्रौत्सवाच्या पूर्वसंध्येला अंबाबाई मंदिर उजळून निघाले आहे.
दरम्यान, यावर्षी पहिल्यांदाच भक्तांविना उत्सव पार पडत आहे. मात्र, उत्सवात कोणतीही कमी भासू नये, याची पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पुरेपूर काळजी घेतली असून त्याच उत्साहात यावर्षीचा नवरात्रोत्सव पार पडणार असून दररोज देवीची विविध रूपात पूजा बांधण्यात येणार आहे. अंबाबाई मंदिराची ही नयनरम्य दृश्य खास 'ईटीव्ही भारत'च्या प्रेक्षकांसाठी...