महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mass Self Immolation Attempt Kolhapur : ४४ धरणग्रस्तांनी केला सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न, पोलीस आले म्हणून अनर्थ टळला.. - Kolhapur Collector Office

काळम्मावाडी धरणग्रस्तांच्या ( Kalammawadi Dam Affected ) पुनर्वसनासह विविध प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहेत. या प्रश्नांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ आज काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेच्या 44 कार्यकर्त्यांनी सामूहिकरित्या कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला ( Mass Self Immolation Attempt Kolhapur ) . मात्र, पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी ( Police Firefighters Kolhapur ) आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या 44 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या ज्वालाग्रही पदार्थाच्या बाटल्या जप्त ( Flammable Substances Bottles Confiscated ) केल्या आहेत. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ( Kolhapur Collector Office ) परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

By

Published : Dec 23, 2021, 6:26 PM IST

कोल्हापूर : काळम्मावाडी धरणग्रस्त ( Kalammawadi Dam Affected ) संघटनेच्यावतीने पुनर्वसनासह इतर मागण्यांसाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध स्तरावर लक्षवेधी आंदोलने उपोषणे करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाच्यावतीने धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र, हे लेखी आश्वासन पूर्ण न झाल्याने आज या 44 धरणग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ( Kolhapur Collector Office ) दारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला ( Mass Self Immolation Attempt Kolhapur ). यावेळी पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी ( Police Firefighters Kolhapur ) या आंदोलकांना रोखत त्यांना पोलीसानी जबरदस्तीने ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून पोलिसांनी ज्वलनशील पदार्थाच्या बाटल्या जप्त केल्या ( Flammable Substances Bottles Confiscated )आहेत.

४४ धरणग्रस्तांनी केला सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न, पोलीस आले म्हणून अनर्थ टळला..
या आहेत धरणग्रस्तांच्या मागण्या

दूधगंगा प्रकल्पातील पाण्याच्या पातळीवरच्या बुडीत क्षेत्राबाहेरील जमिनीचा मोबदला मिळावा, दूधगंगा प्रकल्पातील मंजूर नागरी सुविधांना अनुभव मिळून रखडलेली कामे सुरू करण्यात यावीत, वंचित खातेदारांना जमीन मिळावी या काळम्मावाडी धरणग्रस्तांच्या प्रमुख मागण्या आहेत. तसेच पाटगाव प्रकल्पातील वंचित धरणग्रस्तांना जमीन मिळावी, फये प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना शासनाच्या नियमाप्रमाणे गायरानातील जमीन मिळावी, प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवरील अतिक्रमणांना आळा घालावा, कर्ज तुळशी प्रकल्पातील देवस्थान जमिनी बदलून मिळावी या सह अन्य मागण्या घेऊन आता धरणग्रस्त चांगलेच आक्रमक झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details