कोल्हापूर - पन्हाळागडावर पुन्हा एकदा बिबट्याने एका श्वानावर हल्ला (Attempt by leopard to attack dog) करण्याचा प्रयत्न केला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. काही दिवसांपूर्वीच अशा पद्धतीने बिबट्याने श्वानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर लगेचच घडलेली ही घटना आता सीसीटीव्ही फुटेजमुळे समोर आली आहे.
Leopard Attack : बिबट्याचा श्वानावर हल्ला करण्याचा प्रयत्न; घटना सीसीटीव्हीत कैद - बिबट्या हल्ला पन्हाळागड
परिसरात बिबट्याचा वावर नेहमीच पाहायला मिळाला आहे. अनेकांना बिबट्या निदर्शनास सुद्धा पडला आहे. मात्र येथील डॉ.राजेंद्र होळकर यांच्या घराच्या परिसरातच बिबट्याचा वारंवार वावर पाहायला मिळत आहे. आजपर्यंत त्यांच्या अनेक श्वानावर बिबट्याने हल्ला करून ठार केले आहे. गेल्या महिन्यातच त्यांच्या घराबाहेरच्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्याने घरातील श्वानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे कैद झाले होते.
पन्हाळागड आणि परिसरात बिबट्याचा वावर नेहमीच पाहायला मिळाला आहे. अनेकांना बिबट्या निदर्शनास सुद्धा पडला आहे. मात्र येथील डॉ.राजेंद्र होळकर यांच्या घराच्या परिसरातच बिबट्याचा वारंवार वावर पाहायला मिळत आहे. आजपर्यंत त्यांच्या अनेक श्वानावर बिबट्याने हल्ला करून ठार केले आहे. गेल्या महिन्यातच त्यांच्या घराबाहेरच्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्याने घरातील श्वानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे कैद झाले होते. यावेळी सुद्धा त्यांच्या श्वानावर हल्ला करण्याचा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान, श्वानाच्या ओरडण्याच्या आवाजामुळे डॉ. होळकर यांच्या घरातील सदस्याने तत्काळ अंगणातील लाइट लावल्याने बिबट्या तिथून पसार झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
हेही वाचा -Vegetables price hike : चिकनपेक्षा शेवग्याच्या शेंगा महाग; किलोला 400 रुपयांचा भाव