कोल्हापूर- कोल्हापूर महानगरपालिकेत मात्र गाजलेल्या घोटाळ्यामुळे सहायक उपायुक्तंची पदावनती करण्यात आली असून ते क्लार्क या पदावर काम करणार आहेत. राज्यात पहिल्यांदाच अशी कारवाई झाल्याने सर्वजण अवाक् झाले आहेत. या कारवाईसाठी महापालिकेतील नगरसेवक भूपाल शेटे यांनी माहिती अधिकारातून ही माहिती उघड केल्यानंतर शैक्षणिक कागदपत्र बनावट असल्याचे दिसून आले. तर घरफाळा घोटाळ्यातही या क्लार्कचा हस्तक्षेप असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी संजय भोसले यांना कारवाईची नोटीस बजावली आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या घरफाळा घोटाळा चांगलाच चर्चेत आहे. सुमारे 3 कोटी 14 लाख 61 हजार 38 रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी केला होता. त्यांनी ही बाब माहिती अधिकारातून उघड केली होती. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रकरणाचा जसजसा उलगडा लागत गेला तसतसे अनेक मासे गळाला लागले. त्यातून अधिकाराचा गैरवापर करत शहरातील बड्या मिळकतधारकांना घरफाळा करमध्ये सवलत दिल्या प्रकरणी महापालिकेच्या विभागाचे दोन अधीक्षक, एक करनिर्धारक संग्राहक आणि एक लिपिक अशा चौघांवर संशयाची सुई अडकली होती. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. तर त्याच प्रकरणातील महानगरपालिकेचे करनिर्धारक व संग्राहक संजय शिवाजीराव भोसले यांनी नोकरीस लागताना बनावट शैक्षणिक कागदपत्र जमा केल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली. चौकशीअंती महापालिकेकडून संजय भोसले यांचे कोणतेच कागदपत्र उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
क्लार्क ते रुबाबदार सहायक उपायुक्त
संजय भोसले हे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये क्लार्क पदावर रुजू झाले. केवळ अकरा वर्षांत त्यांनी क्लार्क पदावरून थेट सहायक उपायुक्त पदापर्यंत मजल मारली. महापालिकेत एखादा ठराव करायचा आणि त्या ठरावावर भरती मिळवायचा, असा प्रयत्न त्यांचा सुरू राहिला. या अकरा वर्षाच्या कालावधीत क्लार्क, लेखापरीक्षक, परिवहन अधिकारी, नगर रचनाकार, कर निर्धारक, असा प्रवास करत संजय भोसले हे सहायक उपायुक्त पदापर्यंत पोहोचले होते.
नापास भोसले उच्च विद्याविभूषित तरुणांच्या मुलाखती घ्यायचे