महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील मैदानात; सतेज पाटलांनी केली घोषणा - Kolhapur Elections 2019

काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे आगामी विधासभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा आमदार सतेज पाटील यांनी केली. ऋतुराज हे निवडणुकीच्या रिंगणात आल्यानंतर डी. वाय पाटील घराण्यातील तिसरी पिढी त्यांच्या रुपाने राजकारणात प्रवेश करणार आहे.

आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील

By

Published : Sep 5, 2019, 5:09 PM IST

Updated : Sep 5, 2019, 5:27 PM IST

कोल्हापूर - काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे आगामी विधासभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा आमदार सतेज पाटील यांनी केली. यानंतर जिल्ह्यातील दक्षिण विधासभा मतदारसंघातून पुन्हा पाटील-महाडिक यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना सतेज पाटलांनी ही माहिती दिली.

हेही वाचा - दोन वेळेस पराभूत उमेदवारांना उमेदवारी देऊ नका; काँग्रेस नेत्यांची मागणी

ऋतुराज हे निवडणुकीच्या रिंगणात आल्यानंतर डी. वाय पाटील घराण्यातील तिसरी पिढी त्यांच्या रुपाने राजकारणात प्रवेश करणार आहे. यांनतर विद्यमान आमदार अमल महाडिक आणि ऋतुराज पाटील या दोघांमध्ये लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 2014 साली या मतदारसंघातून सतेज पाटील यांनी निवडणूक लढविली होती.

हेही वाचा - अमरावती विधानसभा आढावा : आमदार डॉ. सुनील देशमुख यांना कोण आव्हान देणार?

याचबरोबर सतेज पाटील यांनी विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे विधानपरिषदेतील संख्याबळ कमी होऊ नये, यासाठी विधानपरिषदेतील सदस्यांनी विधानसभा लढवू नये, असे काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवरही हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

Last Updated : Sep 5, 2019, 5:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details