कोल्हापूर- एशियन पेंट कंपनीने प्रसिद्ध केलेल्या एका जाहिरातीवरून कोल्हापूरकर चांगलेच संतप्त झाले होते. अखेर कोल्हापूरच्या दणक्याने एशियन पेंटने प्रसिद्ध केलेली 'ती' जाहिरात यु ट्यूब वरून काढून टाकली आहे. 'त्या' जाहिरातीविरोधात कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी ट्विट करत कंपनीने जाहिरातीमधून कोल्हापूरचा अपमान केला असून तात्काळ कोल्हापूरकरांची माफी मागावी, अशी मागणी केली होती. शिवाय जाहिरात तत्काळ मागे घ्यावी, असेही म्हटले होते. या जाहिराती संदर्भात संपूर्ण कोल्हापुरात संतापाची लाट उसळल्याने अखेर कंपनीने जाहिरात मागे घेतली आहे.
कोल्हापूरकरांचा दणका..! एशियन पेंटने 'ती' जाहिरात यु ट्यूब वरून हटवली - कोल्हापूर संदर्भात वादग्रस्त जाहिरात
एशियन पेंटने 4 दिवसांपूर्वी एक नवीन जाहिरात प्रसिध्द केली होती. या जाहिरातीमध्ये कोल्हापूरला हिनवण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूरचा अपमान झाल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी म्हटले होते. जे कोल्हापूर छत्रपती शाहू महाराजांनी घडवले ज्या कोल्हापूरने अनेकांना घडवले त्याच कोल्हापूरला जाहिरातीमधून अपमानाचा प्रयत्न झाला असून ते आम्ही कधीही सहन करणार नाही. त्यामुळे तत्काळ जाहिरात मागे घेऊन सर्वांची माफी मागावी, असे ट्विट आमदार पाटील यांनी केले होते.
एशियन पेंटने 4 दिवसांपूर्वी एक नवीन जाहिरात प्रसिध्द केली होती. या जाहिरातीमध्ये कोल्हापूरला हिनवण्यात आले होते. असे करणे हे संपूर्ण कोल्हापूरचा अपमान झाल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी म्हटले होते. जे कोल्हापूर छत्रपती शाहू महाराजांनी घडवले ज्या कोल्हापूरने अनेकांना घडवले, त्याच कोल्हापूरला जाहिरातीमधून हिनाविण्याचा प्रयत्न झाला असून ते आम्ही कधीही सहन करणार नाही. त्यामुळे तत्काळ जाहिरात मागे घेऊन सर्वांची माफी मागावी, असे ट्विट आमदार पाटील यांनी केले होते. त्यानंतर लगेचच कोल्हापुरातील विविध संघटनांनी कंपनीविरोधात निदर्शने केली.
कोल्हापूरकरांचा रोष आणि विरोध पाहता अखेर एशियन पेंटने एका दिवसातच आपली प्रसिध्द केलेली जाहिरात मागे घेतली. मात्र अजूनही अनेक संघटना कंपनीने माफी मागावी या मागणीवर ठाम आहेत. एशियन कंपनीने केवळ जाहिरातीचा व्हिडिओ मागे घेऊन चालणार नाही, तर त्यांनी कोल्हापूरकरांची माफी मागावीच लागेल या मागणीवर ते ठाम आहेत. त्यामुळे आता कंपनीकडून याबाबत काय स्पष्टीकरण येते हे पाहावे लागणार आहे.