महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एशियन पेंटने संपूर्ण कोल्हापूरवासीयांची माफी मागून त्यांची 'ती' जाहिरात मागे घ्यावी - ऋतुराज पाटील - mla ruturaj patil latest news

एशियन पेंटने वादग्रस्त जाहिरात तात्काळ मागे घ्यावी आणी कोल्हापूरची माफी मागावी अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी केली आहे. ही जाहीरात म्हणजे कोल्हापूरला हिनवल्याचा प्रकार असल्याचे सुद्धा ते म्हणाले.

Asian Paint Company should withdraw the advertisement and apologize
एशियन पेंटने संपूर्ण कोल्हापूरवासीयांची माफी मागून त्यांची 'ती' जाहिरात मागे घ्यावी - ऋतुराज पाटील

By

Published : Aug 25, 2020, 8:39 PM IST

कोल्हापूर-एशियन पेंटने बनवलेल्या एका जाहिरातीला तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी ही मागणी केली असून त्या जाहिरातीद्वारे कोल्हापूरचा अपमान करून हिनवल्याचा प्रकार घडल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी म्हंटले आहे. शिवाय त्यांनी तात्काळ ही जाहिरात मागे घेऊन संपूर्ण कोल्हापूरवासीयांची माफी मागा, अशी मागणी केली आहे.

संपूर्ण जगभरातून पर्यटक अंबाबाईच्या दर्शनाला येत असतात. मात्र, जाहिरातमध्ये कोल्हापूरला हिनवले आहे. शिवाय आमच्या कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराज यांनी घडवलेले आहे. अनेक यशस्वी व्यक्ती या कोल्हापूरच्या मातीमध्ये घडल्या आहेत. त्या पद्धतीने जाहिरातीमध्ये कोल्हापूरला हिनवण्याचा प्रकार घडला आहे. हे आम्ही कधीही सहन करणार नाही. त्यामुळे याबाबत तात्काळ जाहिरात मागे घेऊन कोल्हापूरची माफी मागावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.

इतर सर्वच चॅनेलनी ही जाहिरात दाखवू नये अशी विनंतीसुद्धा आमदार ऋतुराज पाटील यांनी केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून आमदार ऋतुराज पाटील यांनी ही मागणी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details