कोल्हापूर - आयुष मंत्रालयाकडून वाटप करण्यात येत असलेल्या आर्सेनिक अलबम या होमिओपॅथिक गोळ्यांची नियमापेक्षा ज्यादा मागणी गावकऱ्यांनी केली. ते देण्यासाठी विरोध केल्याने करवीर तालुक्यातील खाटांगळे येथे आशा वर्करला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्यासह चौघांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मारहाण करणार्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत करवीर तालुक्यातील सर्व आशा वर्करसनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
शोभा अशोक तळेकर या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आशा सेविका म्हणून कार्यरत आहेत. गावामध्ये महाआयुष कामकाजाचा सर्व्हे करत असताना त्या घरातील पन्नास वर्षाहून मोठ्या व्यक्तींना होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करत होत्या.