कोल्हापूर - पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत रोज नव्याने वाढ होत आहे. त्यामुळे आजुबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. शिरोळ तालुक्यातील शिरदवाड गावच्या स्मशानभूमी परिसरात पंचगंगा नदीचे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे गावातील ग्रामस्थांना रस्त्यावरच अंतिम संस्कार करण्याची वेळ आली आहे. ( The Water Level Of Panchganga River Increased ) त्यामुळे शासनाने पुराचा फटका बसणाऱ्या स्मशानभूमीचे योग्य जाग्यावर स्थलांतर करावे किंवा दुसरी सुविध उपलब्ध करून द्यावी अशी विनंती ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
अंत्यसंस्कार रस्त्याच्याबाजूला करण्याची वेळ -गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा सामना करावा लागत आहे. (2005 2019) आणि (2021)ला तर महापुराचे पाणी शहरात आल्याने जनजीवन विस्कळित झाले होते. यावर्षीही तिच परिस्थिती आहे. त्या पार्श्वभूमिवर नागरिक त्रस्थ आहेत. गेल्या काही वर्षात नदीचे पाणी वाढले की पाणी स्मशानभूमीत शिरल्याने येथे अंत्यसंस्कार करता येत नाहीत अशी परिस्थिती आहे.