कोल्हापुर:कोल्हापुरातील कनेरी मठावर गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पंचमहाभूत लोकोत्सव सुरू आहे. यासाठी देशातून हजारो नागरिक येथे येत आहेत. येथे जनावरांचा प्रदर्शन देखील भरवण्यात आले आहे. मठावर भव्य असे गायींचे गोशाळा असून येथे हजारो गायीचे सांभाळ होतो. मात्र सध्या सुरू असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवात आलेल्या नागरिकांसाठी जेवण तयार केले जाते. मात्र मोठ्या प्रमाणात हे जेवण शिल्लक राहत असल्याने हे जेवण गोशाळेतील गाईंना घातल्याने तब्बल 50 ते 54 गाईंचा मृत्यू झाला आहे तर 30 गाय हे गंभीर झाले आहे.
गाईंवर उपचार सुरू: कोल्हापुरातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम गुरूवारी रात्रीपासून गाईंवर उपचार सुरू करत आहेत. मात्र मृत झालेल्या गायींचा अधिकृत आकडा सांगण्यास पशुवैद्यकीय अधिकारी देखील तयार नाहीत. मृत गाईंचे पोस्टमार्टम करून त्याचा तपास केला जाणार आहे. मठाकडून माहिती लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न होत आहे. लाखो करोडो रुपये खर्चून मठावर सुरू असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवाला गालबोट लागला आहे.
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न: एका ठिकाणी हजारो भाकरी व चपात्यांचा ढीग लागला आहे. अन्न वाया जाऊ नये याकरिता हे सर्व येथील गाईंना खाऊ घालण्यात येत आहे. हा सर्व प्रकार गुरूवारी रात्रीपासून घडत आहे. मृत झालेल्या अनेक गाईंना पुरण्यात आले आहे. सदर बातमी घेण्यासाठी गेलेल्या प्रसारमाध्यमांवर देखील दबाव टाकला गेला. तसेच बातमी प्रसारित करू नये व प्रकरण दडपण्याचा प्रयत्न मठ प्रशासनाकडून होत आहे.
मुख्यमंत्रींनी दिली होती भेट: कोल्हापुरातील कनेरी मठ येथे सुरू असलेल्या या पंचमहाभूत लोकोत्सवासाठी सुमारे कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते राज्यपाल येथे हजेरी लावली होती. तर पर्यावरणाचे महत्त्व व प्राण्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी येथे प्रदर्शन भरवण्यात आले. विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील येथे लावण्यात आले आहेत. मात्र अपेक्षेपेक्षा कमी आणि या प्रदर्शनाकडे नागरिकानी पाठ फिरवल्याने, रोज हजारो किलोचे जेवण वाया जात आहे. यामुळे यातील भाकरी चपातीचे ठीक झाले आहे. हे सर्व अन्न येथील पशुंना खाऊ घातल्यामुळे कदाचित फूड पॉइजन झाल्याने हे सर्व गाई दगावले आहेत.
हेही वाचा: Kolhapur News कोल्हापुरात पंचमहाभूत लोकोत्सवात गाढवांच्या प्रदर्शनाने वेधले लक्ष