कोल्हापुरातल्या शाहुवाडीतील आंबा-तळवडे येथे सशस्त्र दरोडा; दहा लाखांचा मुद्देमाल लंपास - दरोडा
शाहूवाडी तालुक्यातील आंबा-तळवडे येतील शांतय्या शंकराय्या स्वामी यांच्या घरावर हा दरोडा पडला आहे. रात्री उशिरा दरोडा टाकून दरोडेखोरांनी 10 लाख रुपयाचा मुदेमाल चोरून नेला आहे. यामध्ये रोख दोन लाख रुपये, 5 तोळे सोन्याचे दागिणे आणि 1 बोलेरो गाडीचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.
कोल्हापूर - शाहूवाडी तालुक्यात सशस्त्र दरोडा (Armed robbery) पडल्याची घटना समोर आली आहे. शाहूवाडी तालुक्यातील (Shahuwadi taluka) आंबा-तळवडे (Amba-Talwade ) येतील शांतय्या शंकराय्या स्वामी यांच्या घरावर हा दरोडा पडला आहे. रात्री उशिरा दरोडा टाकून दरोडेखोरांनी 10 लाख रुपयाचा मुदेमाल चोरून नेला आहे. यामध्ये रोख दोन लाख रुपये, 5 तोळे सोन्याचे दागिणे आणि 1 बोलेरो गाडीचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. गंभीर बाब म्हणजे यामध्ये दोन जणांना कोयता आणि तलवारीने वार सुद्धा करून जखमी केल्याचे समजते. दरम्यान, पोलीस घटनास्थळी पोहोचले असून याबाबत माहिती घेत आहेत. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.