कोल्हापूर- कोविडच्या प्रादुर्भावामुळे याही शैक्षणिक वर्षाची सुरुवात ‘डिजिटल पद्धतीने' झाली. मागील शैक्षणिक वर्षात अनेक शाळांनी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण, प्रत्यक्ष डिजिटल अध्ययन, अध्यापनात मात्र शिक्षक, विद्यार्थी व प्रशासनास विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व समस्यांचा अभ्यास करत तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांच्या दीप फाऊंडेशनने खास मराठी शाळांसाठी सर्वसमावेशक असा 'ऑनलाइन शाळा' नावाचा प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली कागल तालुक्यातील तसेच पारनेर, अहमदनगर व कर्जत-जामखेड या तालुक्यातील जवळपास 42 हजार सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.
काय आहे 'ऑनलाइन शाळा'
'ऑनलाइन शाळा' हा राज्यातील सर्व शिक्षक, विद्यार्थी, शाळा व प्रशासकीय अधिकारी यांना एकत्रित जोडणारा अॅण्ड्रॉइड प्लॅटफॉर्म आहे. सदर प्लॅटफॉर्मच्या मदतीने अध्ययन-अध्यापन, मूल्यमापन, पूरक अध्यापन, स्वयंअध्ययन तसेच शाळा व्यवस्थापन या सर्व गोष्टी ऑनलाइन पद्धतीने यशस्वीरित्या राबवता येतात. हे प्रायोगिक तत्त्वावर सिद्ध झाले आहे. 'ऑनलाइन शाळा' सॉफ्टवेअरच्या टीचर लॉगीनला प्रत्येक शिक्षकाला स्वतंत्र डिजिटल लेसन प्लॅन करण्याची सुविधा देण्यात आली आहे. पण, 'ऑनलाइन शाळा' सॉफ्टवेअरच्या मॉनिटरींग डॅशबोर्ड ॲनालिटीक्सनुसार ज्या शिक्षक मित्रांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविण्यात रुची नाही किंवा जे शिक्षक आपला स्वतंत्र डिजिटल लेसन प्लॅन तयार करण्यात असमर्थ आहेत त्या शिक्षकांच्या विद्यार्थ्यांचे गेल्या वर्षभरात शैक्षणिक नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे.
'ऑनलाइन शाळा व्हर्च्युअल अकॅडमी' ही राज्यतील पहिली व नाविन्यपूर्ण संकल्पना असून या संकल्पने अंतर्गत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षण विभाग पंचायत समिती कागल यांच्या सहकार्याने दीप फाऊंडेशनने कागल तालुक्यात अत्याधुनिक लेक्चर कॅप्चर स्टुडिओची निर्मिती केली आहे. या स्टुडिओमध्ये मराठी व सेमी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार ॲक्च्युअल टीचिंग, इ-लर्निंग कंटेन्ट बँक बनवली जात आहे.
यासाठी 60 तज्ज्ञ शिक्षकांची निवड