कोल्हापूर - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची रविवारी कोल्हापुरात जाहीर सभा होणार आहे. कळंबा परिसरातील तपोवन मैदानावर सकाळी 12 वाजता ही सभा होणार आहे.
रविवारी अमित शाह यांची कोल्हापूरात जाहीर सभा - अमित शहा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची रविवारी कोल्हापुरात जाहीर सभा होणार आहे. कळंबा परिसरातील तपोवन मैदानावर सकाळी 12 वाजता ही सभा होणार आहे.
अमित शाह
उजळाईवाडी विमानतळावरून शहा आणि योगी आदित्यनाथ हे दोघेही थेट सभेच्या ठिकाणी येणार आहेत. या सभेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीचे सर्व उमेदवार, घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सभेच्या पार्श्वभूमीवर मैदान आणि परिसराभोवती कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. शिवाय या संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली जात आहे. याठिकाणी दोन हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.