कोल्हापूर :मावळत्या सूर्यकिरणांनी करवीर निवासिनी अंबाबाई मूर्तीच्या ( Ambabai Temple Kolhapur ) गळ्याला स्पर्श केला. अंबाबाईचा वर्षातून दोनदा किरणोत्सव सोहळा ( Kironotsav ceremony ) पार पडत असतो. या सोहळ्यात मावळतीची सूर्यकिरणे महाद्वारातून अंबाबाई मंदिरात ( Ambabai Temple sunset ) प्रवेश करतात. प्रवासाचा एक एक टप्पा पार करत पहिल्या दिवशी किरणे अंबाबाईच्या मूर्तीचा चरणस्पर्श करतात, दुसऱ्यादिवशी कमरेपर्यंत व तिसऱ्या दिवशी किरणे चेहऱ्यावर येऊन किरणोत्सव पूर्ण होतो.
Ambabai Temple Kolhapur : मावळत्या सुर्याची किरणे अंबाबाईच्या चरणी - Ambabai Temple sunset
मावळत्या सूर्यकिरणांनी कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात ( Ambabai Temple Kolhapur ) प्रवेश केला. अंबाबाईचा वर्षातून दोनदा किरणोत्सव सोहळा ( Kironotsav ceremony ) पार पडतो. या सोहळ्यात मावळतीची सूर्यकिरणे महाद्वारातून अंबाबाई मंदिरात प्रवेश करतात.
किरणोत्सवाचे थेट प्रक्षेपण -आज, सायंकाळी ५ वाजून 1 मिनिटांनी सूर्यकिरणे महाद्वार मधून मंदिरात आली. ५ वाजून ४४ मिनिटांनी किरणांनी अंबाबाई मूर्तीचा चरणस्पर्श केले. ५ वाजून ४६ मिनिटांनी किरणांनी देवीच्या कंबरेला स्पर्श करत ५ वाजून ४८ मिनिटांनी सूर्याची किरणे अंबाबाईच्या गळ्याला स्पर्श करत लुप्त झाले. यानंतर देवीची आरती करण्यात आली. यावेळी किरणोत्सव पाहण्यासाठी मंदिर आवारामध्ये सीसीटीव्ही नियंत्रकक्ष यांच्या लाईव्ह कॅमेऱ्याच्या सोर्स मधून किरणोत्सवाचे थेट प्रक्षेपण एलईडी स्क्रीनवर देण्यात आले होते.