महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kolhapur Ambabai : अंबाबाई मंदिरास शके 1786 मधील दुर्मिळ हस्तलिखित गुरुचरित्र ग्रंथ प्राप्त - Gurucharitra Granth in 1786

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून अंबाबाई मंदिर ( Ambabai Temple ) संदर्भात ग्रंथालय उभा करण्यात येणार आहे, याबाबतची माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली असून या ग्रंथालयासाठी शके 1786 मधील एक हस्तलिखित प्राप्त झाले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Nov 18, 2022, 8:52 PM IST

कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले श्री. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर ( Ambabai Temple ). या मंदिराचा इतिहास प्राचीन तर आहेच पण या मंदिराने अनेक शतकांचा इतिहास घडताना पाहिला आहे. येथे दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. अनेक भक्तांना मंदिराचा आणि शहराचा इतिहास आणि माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असते. यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून अंबाबाई मंदिर संदर्भात ग्रंथालयाची निर्मीती करण्यात येणार आहे, याबाबतची माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली असून या ग्रंथालयासाठी शके 1786 मधील एक हस्तलिखित प्राप्त झाले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.


शके 1786 मधील एक हस्तलिखित प्राप्त - हे हस्तलिखित शके 1786 मधील असून गुरू चारित्र हस्तलिखित तर आहेच शिवाय दुर्मिळ देखील आहे. गुरुचरित्र ग्रंथ हा गाणगापूर नरसिंहवाडी तसेच कारंजा येथील मध्ययुगीन कालखंडातील दत्त विभूती महाराज यांचे चरित्र असल्याचे गणेश नेर्लेकर यांनी म्हटले आहे. हे हस्तलिखित पूर्वीच्या हातभट्टीच्या कागदावर नैसर्गिक शाई पासून हे तयार करण्यात आले असून अशा हस्तलिखित ग्रंथांचा संदर्भांचा वापर करत पुस्तक निर्माण होत असते, असे सांगितले.

1786 मधील दुर्मिळ हस्तलिखित गुरुचरित्र ग्रंथ प्राप्त
1786 मधील दुर्मिळ हस्तलिखित गुरुचरित्र ग्रंथ


ग्रंथालयाची निर्मिती - या ग्रंथालयासाठी देवस्थापन समितीकडून जोरदार तयारी सुरू असून देवस्थान बरोबरच आणखी काही संस्थाची मदत घेवून मंदिरासाठी आणि धार्मिक कार्यासाठी इतिहासाचा उलघडा करण्यासाठी आणि कागदोपत्री इतिहास मांडण्यासाठी या ग्रंथालयांची निर्मिती होत असून आणखी काही माहिती किंवा असे ग्रंथ हस्तलिखित भाविकांकडे असतील तर ते मंदिरासाठी द्या,वे असे आवाहन ही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details